लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद बदल्यांचे सत्र गुरुवारपासून सुरू करण्यात आले. परंतु दुपारनंतर शिक्षक मतदारसंघासाठीची आचारसंहिता सुरू लागू झाल्याने ऐनवेळी ही प्रक्रिया थांबविण्यात आली. आता शासनाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामुळे बदलीपात्र कर्मचा:यांनी तात्पुरत्या स्वरूपात सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध दहा ते बारा विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू होती. गुरुवारी समुपदेशन शिबिरांतर्गत कर्मचा:यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सकाळपासून समुपदेशन शिबिर घेण्यात आले. दुपार्पयत चार विभागांची प्रक्रिया पार पडल्यानंतर आचारसंहितेच्या कारणामुळे ऐनवेळी ही प्रक्रिया थांबविण्यात आली.समुपदेशन शिबिरजिल्हा परिषद सभागृहात गुरुवार, 24 रोजी सकाळपासून समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी अर्थ विभाग, बांधकाम विभाग, लघुसिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या बदल्यांचा समावेश होता. त्यानुसार प्रत्येक विभागनिहाय बदलीपात्र कर्मचा:यांना पाचारण करण्यात येत होते.याआधीच सेवाज्येष्ठतेनुसार व बदलीपात्र कर्मचा:यांच्या याद्या जिल्हा परिषदेने पंचायत समिती स्तरावरून व त्या त्या विभागाकडून मागविल्या होत्या. त्यानुसार बदलीच्या सॉफ्टवेअरमध्ये ते फिड करण्यात आले होते. बदलीपात्र कर्मचा:यांना समुपदेशन शिबिरात बोलावून त्यांना सभागृहातील स्क्रीनवर रिक्त होणा:या एक ते पाच जागा दाखविल्या जात होत्या. कर्मचा:याने पसंतीक्रमानुसार जागा निवडल्यावर जागा रिक्त असल्यास लागलीच संबंधिताला त्या जागेवर बदली मिळत होती. यामुळे बदल्यांमध्ये कुठेही कुणा पदाधिकारी, अधिकारी किंवा इतर मध्यस्थाचा हस्तक्षेप राहत नव्हता. त्यामुळे कर्मचा:यांमध्येदेखील समाधान व्यक्त करण्यात आले. कर्मचा:यांना बदली ऑर्डर मिळाल्यानंतर 31 मेच्या आत लागलीच रुजू होण्याचे आदेश देण्यात येणार होते. त्यामुळे संबंधित ठिकाणाचे काम रखडणार नाही याची दक्षता घेण्याचा उद्देश त्यामागे होता.व्हिडिओ चित्रीकरण : संपूर्ण बदली प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणदेखील करण्यात येत होते. जेणेकरून या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी हा त्यामागचा उद्देश आहे. दरम्यान, शुक्रवारी आरोग्य विभागाच्या राहिलेल्या बदल्या आणि सामान्य प्रशासन, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागासह इतर विभागांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. शिक्षक बदल्यांचे काय? शिक्षक बदल्याही आचारसंहितेत अडकतात किंवा कसे याकडेही लक्ष लागून आहे. कारण या बदल्या राज्यस्तरावरून ऑनलाईन करण्यात येत आहेत. काही जिल्ह्यात आदेशही प्राप्त झाले आहेत. याकडेही लक्ष लागून आहे.अधिकारी, पदाधिकारी उपस्थित : बदल्यांच्या समुपदेशन शिबिरात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना बसता येते. त्यांच्या निगराणीखाली प्रक्रिया राबविता येते. याशिवाय संबंधित विभागाचे विभागप्रमुखही उपस्थित राहतात. शिबिराच्या सकाळच्या सत्रात उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख व बदलीपात्र कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही सभागृहात बसण्याची परवानगी देण्यात आली नाही.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता गुरुवारी दुपारनंतर लागू करण्यात आली. ही माहिती जिल्हा परिषदेर्पयत पोहचण्यात सायंकाळ झाली. तोर्पयत बदली प्रक्रिया कायम होती. आचारसंहिता लागू झाल्याचे समजताच प्रक्रिया थांबविण्यात आली. यासंदर्भात जिल्हा परिषदेने तातडीने आयुक्तालय व मंत्रालयात याबाबत मार्गदर्शन घेतले. त्यांनी बदली प्रक्रिया थांबविणे किंवा रद्द करण्याचे सूचित केल्यानंतर लागलीच सकाळपासून सुरू असलेली बदल्यांची प्रक्रिया बंद करून अधिकारी, कर्मचारी आपल्या कामाला लागले.
जि.प.कर्मचारी बदली प्रक्रिया ऐनवेळी झाली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:32 PM