खापर आणि अक्कलकुवा येथील या केंद्रांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगला वाव नसल्याने कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होत होता. यामुळे खापर गटातील आमलीफळी जिल्हा परिषद शाळा रोडच्या डाव्या बाजूला पूर्वेकडील खोली क्रमांक एक मतदान केंद्र याच ठिकाणी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ठेवण्यात आले आहे. या मतदान केंद्राला खापर ते ब्राम्हणगाव रस्ता गणेश मंदिर, खापर ते जावली रस्ता, जिल्हा परिषद मुलांची शाळा खापर हा भाग जोडण्यात आला आहे
अक्कलकुवा येथील न्यू इंग्लिश स्कूल पूर्व-पश्चिम इमारत पूर्वेकडून खोली क्रमांक तीन मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी अक्कलकुव्यातील मेनरोड, झेंडा चौक,जैन मंदिर, नर्मदा नगर,सिता नगर, हवलदार फळी,कुंभार गल्ली, इंदिरा नगर हा भाग जोडण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूल पूर्व पश्चिम इमारत पूर्वेकडून खोली क्रमांक पाच व सात मतदान केंद्राची निर्मिती झाली आहे. याठिकाणी नवोदय विद्यालय, संजय नगर, कुंभार गल्ली, इंदिरा नगर, बाजार गली, मेनरोड, नर्मदा नगर या परिसराचा समावेश करण्यात येऊन मतदान केंद्राचे ठिकाण बदल करण्यात आला आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. मैनाक घोष, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी रामजी राठोड, महसूल सहाय्यक राजरत्न सोनवणे, महसूल सहाय्यक अशोक डोईफोडे तहसील अक्कलकुवा उपस्थित होते.