लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : भाविकांनी वर्षभरात केलेल्या एक अब्ज 27 कोटी 68 लाख रामनाम जपची संख्या ताम्रपत्रावर कोरून ते ताम्रपत्र येथील जागतिक रामनाम जप बँकेत जमा करण्यात आले. या वेळी रामानंदपुरी महाराज यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते.प्रकाशा येथे 1983 मध्ये ब्रrालीन संतश्री दगाजी महाराज यांनी रामनाम जप बँकेची स्थापना केली. या उपक्रमाद्वारे भाविकांनी वर्षभरात केलेल्या रामनाम जपची संख्या ताम्रपत्रावर कोरून महाशिवरात्रीच्या रात्री ताम्रपत्र या बँकेत जमा केले जाते. मागीलवर्षी महाशिवरात्रीला 298 भाविकांना रामनाम जप कार्ड वाटप करण्यात आले होते. या भाविकांनी वर्षभरात आपल्या सोयीनुसार या कार्डवर रामनाम जप लिहीले. तसेच 11 ते 14 फेब्रुवारीर्पयत येथील सद्गुरू धर्मशाळेत सुमारे दीड हजार भाविकांनी रामनाम जप केले. वर्षभरात भाविकांनी एक अब्ज 27 कोटी 68 लाख जप केले. ही संख्या येथील बालकृष्ण सोनार यांनी ताम्रपत्रावर कोरली. या वेळी रामानंदपुरी महाराज, साध्वी कमलबेन, सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी, संचालक पांडू पाटील व शेकडो भाविक उपस्थित होते. जपची संख्या कोरलेल्या ताम्रपत्राची वाजत-गाजत मिरवणूक काढून केदारेश्वर व काशीविश्वेश्वर मंदिरावर दर्शनासाठी नेण्यात आले. त्यानंतर जागतिक रामनाम जप बँकेत ताम्रपत्र जमा करण्यात आले. यावर्षी निझर येथील सद्गुरू कृपा महिला मंडळाने वर्षभरात 33 कोटी 47 लाख जप केले. आतार्पयत या मंडळाने केलेल्या जपची संख्या सर्वाधिक असल्याने सद्गुरू धर्मशाळा ट्रस्टतर्फे मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रकाशा धर्मशाळेत वर्षभरात सव्वा अब्ज रामनाम जप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:36 PM