नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जयजयकाराने अवघी नंदनगरी दुमदुमल्याचे चित्र रविवारी दिवसभर दिसून आले. शिवरायांना अभिवादन करून त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी सर्वानी पुढाकार घेण्याचे आवाहन ठिकठिकाणी आयोजित अभिवादन समारंभांमध्ये करण्यात आले.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिराच्या प्रांगणात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सकाळपासूनच विविध संस्था, संघटना, राजकीय, सामाजिक कार्यकत्र्याची रीघ लागली होती. याशिवाय पालिकेत व पंचायत समिती आवारात असलेल्या अर्धपूर्णाकृती पुतळ्यासह पालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात असलेल्या जागेवरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. चौकाचौकात सकाळपासूनच डीजेच्या तालावर छत्रपतींची गाथा, पराक्रम सांगणारे पोवाडे वाजत होते. अनेक ठिकाणी प्रतिमा पूजनदेखील करण्यात आले.मराठा सेवा संघाचे उपक्रममराठा सेवा संघातर्फे सकाळी अभिवादन कार्यक्रमासह शिवकुटुंब मेळावा आणि वधू-वर परिचय मेळावादेखील घेण्यात आला. यावेळी प्रा.संदीप पाटील व प्रज्ञा साळुंके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, युवराज पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी आर.आर. पाटील, कैलास पाटील, अनिल पाटील, संजय कुवर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, राजेंद्र पाटील, उमेश भदाणे, जे.एन. पाटील, हंसराज पाटील, प्रा. डॉ. माधव कदम, कुंदन पाटील, राजेंद्र शिंदे, प्रमोद बोरसे, अनिल बेडसे, सतीश पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, म.ज्योतिबा फुले, राजमाता जिजाऊ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. संदीप पाटील यांनी सांगितले, शिवाजी महाराजांसारखे नव्हे पण त्यांच्यासारखे आपले बाळ व्हावे अशी इच्छा असेल तर मुलांना मोकळीक द्या, त्यांना खेळू द्या, त्यांना हवे ते, परंतु चांगलेच करू द्या. मुलांना ‘हे करू नको, ते करू नको’ असे म्हणून त्यांचे बालपण हिरावून घेऊ नका. ज्यांची मातीशी नाळ जुळते ते कधी लोकांपासून दूर जात नाहीत. मातीशी नाते घट्ट राहू द्यावे, असे आवाहन प्रा. पाटील यांनी केले.जिजाऊ, सावित्री आणि आजची स्त्री या विषयावर प्रज्ञा धनंजय साळुंके यांनी विचार मांडतांना सांगितले, महिलांनी आता सजग झाले पाहिजे. धर्मग्रथांनी महिलांवर लादलेल्या पुरुषसत्ताक संस्कृतीच्या बेडय़ा तोडल्या पाहिजेत. इतरांवर विसंबून राहू नका, स्वत:चे अस्तित्व निर्माण करा. रडू नका, लढायला शिका, असे आवाहनही तिने केले. आज धर्मचिकित्सेची वेळ आली आहे. जोर्पयत स्त्री-पुरुष समानता होणार नाही त्याखेरीज विकास साध्य होणार नसल्याचेही साळुंके यांनी सांगितले. सूत्रसंचालन मनोज पवार व तोरवणे यांनी केले. आभार कुंदन पाटील यांनी मानले. शिवजयंतीनिमित्त राजे शिवाजी विद्यालयात मराठा सेवा संघाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेते खुशी पाटील, अश्विन गावीत, प्रज्ञा साळुंके, मंगला पाडवी, आसिफ अली गफ्फार खान, प्रतीक सरूयवंशी, रोहित पाटील, चैतन्य रघुवंशी, भावेश पाटील, विश्वजित शिंदे, दर्शना चौधरी, ओम पाटील, गोरख वाघ, अमोल राजपूत आणि शीला बेडसे या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व पुरस्कार वितरित करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा.माधव कदम, राजेंद्र पाटील, विजया पाटील, प्रा.उमेश बागुल, उमेश शिंदे, मनोज शेवाळे आणि छाया बच्छाव यांनी काम पाहिले.वधू-वर परिचय मेळावा4याच कार्यक्रमात मराठा सेवा संघाच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात धुळे, जळगाव आणि नंदुरबारातील विवाहेच्छुक 27 जणांनी नोंदणी केल्याची माहिती वधू-वर सूचक मंडळाचे संजय कुवर यांनी दिली. दुपारी तीन वाजता परिचय मेळावा घेण्यात आला. त्यात 12 जणांनी परिचय करून दिला.
छत्रपतींच्या जयजयकाराने दुमदुमली नंदनगरी
By admin | Published: February 20, 2017 12:44 AM