लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव वाहनाने बैलगाडीला धडक दिल्याने बैलगाडीवरील बालक जागीच ठार झाल्याची घटना नवापूर तालुक्यातील नयनशेवडी गावाजवळ 30 ऑगस्ट रोजी घडली. अंधाराचा फायदा घेत वाहनचालक तेथून पसार झाला. अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर 30 रोजी रात्री 11 वाजता ही घटना घडली. जेमू मोग्या वळवी (सात वर्ष) रा.जांबीपाणी, ता.अक्कलकुवा असे मयत बालकाचे नाव आहे. महार्गावरून अक्कलकुवाहून खापर कडे बैलगाडी जात होती. रात्री अंधारात बैलगाडीचा अंदाज न आल्याने बैलगाडीला मागून जबर धडक दिली. त्यात बसलेला जेमू वळवी हा बालक जागीच ठार झाला. अपघातानंतर वाहनचालक तेथून पसार झाला. याबाबत हवालदार हिदुस्थान नाईक यांनी फिर्याद दिल्याने वाहन चालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात अपघातास कारणीभूत आणि मोटर अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मुकेश पवार करीत आहे.
ट्रकची बैलगाडीला धडक, बालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 11:57 AM