लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 16 वर्षीय बालकाला कामगार म्हणून ठेवत त्याच्याकडून काम करवून घेणा:या शहरातील हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहरातील न्यू नवजीवन हॉटेल येथे हा प्रकार उघडकीस आला़ धुळे येथील सुविधाकार दुकाने निरीक्षक रमेश भिमराव शेळके यांना नंदुरबार शहरातील न्यू नवजीवन हॉटेल येथे बालकामगार कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली होती़ त्यानुसार त्यांनी 3 ऑगस्ट रोजी संबधित हॉटेलमध्ये पोलीस पथकासह छापा टाकला होता़ याठिकाणी विजय बापू पाटील रा़ भोईवाडा हा मुलगा दिसून आला होता़ हॉटेलमालक अमृत लक्ष्मण चौधरी याची विचारपूस केल्यावर योग्य ती माहिती मिळाली नव्हती़ दरम्यान दुकाने निरीक्षक यांनी विजय भोई याचे वय हे 16 वर्ष 4 महिने आणि 7 दिवस असल्याचे निदर्शनास आले होत़े हॉटेलमालक चौधरी कामावर ठेवलेला मुलगा विजय भोई याच्याकडून तीन तासांपेक्षा अधिक काळ काम करुन घेत असल्याचेही निर्दशनास आल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकाराची 3 जुलैपासून चौकशी सुरु होती़ दरम्यान 29 रोजी चौकशी पूर्ण करत तातडीने शहर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यात आला़ याबाबत दुकाने निरीक्षक रमेश शेळके यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हॉटेलमालक अमृत लक्ष्मण चौधरी रा़ जुने कोर्टासमोर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक एम़क़ेक्षीरसागर करत आहेत़ याप्रकरणी अद्याप कोणासही अटक झालेली नाही़ दरम्यान जुलै महिन्यात जिल्ह्यात बाल हक्क संरक्षण आयोगाची सुनावणी झाली होती़ यावेळी जिल्ह्यात एकही बालकामगार नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता़ सुनावणीच्या 10 दिवसांनंतर ही कारवाई होऊन तब्बल 20 दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात बालकामगारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आह़े
बालकाकडून मजूरी करवून घेणा:या हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:35 PM