बोरद, ता.तळोदा, दि.5- तळोदा तालुक्यातील बोरद व मोड परिसरातून दुचाकी आणि पेट्रोल चोरीचे प्रकार वाढल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत़
बोरद परिसरातील गावांमध्ये गेल्या आठ ते 10 दिवसांपासून दुचाकी, पेट्रोल, चारचाकी वाहनातील डिङोल आणि दुचाकीचे स्पेअर पार्ट चोरीचे प्रकार वाढले आहेत़ रात्रीच्यावेळी होणा:या या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत़ मोड, बोरद, मोहिदा, कळमसरे यासह विविध गावांमध्ये हे प्रकार सुरू आहेत़ यामुळे नागरिकांचे नुकसान होत आह़े याबाबत तक्रार करण्यासाठी पोलीस दूरक्षेत्रामध्ये गेल्यावर त्याठिकाणी अधिकारी व कर्मचारी भेटत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आह़े अनेक वेळा कर्मचारी इतर ठिकाणी बंदोबस्त किंवा कार्यालयीन कामकाजासाठी जात असल्याने पोलीस दूरक्षेत्राला टाळे लावल्याचे दिसून आले आह़े चोरीच्या या घटनांची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यात बोरद दूरक्षेत्रावर साधारण 27 गावांचा भार आह़े याठिकाणी पोलीस ठाणे निर्मितीसाठी दरवर्षाला गृहविभागाकडे प्रस्ताव दिला जातो़ हा प्रस्ताव मात्र दरवर्षी रद्दबातल ठरवला जात आह़े पोलीस दूरक्षेत्रावरील अधिकारी व कर्मचा:यांना अपूर्ण साधने असल्याने चोरटय़ांच्या कारवाया वाढल्याचे दिसून येत आह़े (वार्ताहर)