पाईप लाईन तुटली : दोन महिन्यापासून समस्या कायम
तळोदा,दि.4- शहरातील नानावट परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना पाणी मिळण्यास समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
या भागात पालिकेकडून गटारींचे काम सुरु कण्यात आले आह़े खोदकाम करीत असता पाण्याची पाईपलाईन तुटल्याने प्रचंड प्रमाणात पाणी गळती झाली होती़ तसेच पाईप लाईन तुटल्याने नागरिकांना पाण्यासाठीदेखील वणवण करावी लागत आह़े नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांकडून भर उन्हाळ्यात पाण्याचा शोध घेत फिरावे लागत आह़े पाणीपुरवठा खंडीत झाल्याची तक्रार वारंवार पालिका कर्मचा:यांना करण्यात आल्या आह़े परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आह़े पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले व त्यांच्याकडे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आह़े यावेळी गिरीश कापडीया, दिलीप सुगंधी, विशाल चौधरी, ज्योत्स्ना श्रॉफ, इंद्रलाल वाणी, जगदिश सोनार, अनिल सोनार आदी नागरिकांनी मुख्याधिका:यांशी चर्चा केली़ (वार्ताहर)