शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
2
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
3
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
5
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
6
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
7
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
8
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
9
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
11
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
12
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
13
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
14
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
15
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
16
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
18
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
20
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात नागरिक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 12:09 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे कामे घेवून येणाºया नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे कामे घेवून येणाºया नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याची स्थिती आहे. ड्युटी लावण्यावरून दोन अधिकाºयांमध्ये कार्यालयातच फ्रिस्टाईल देखील झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात आठवडाभरात दोन वेळा नागरिकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून निवेदनही दिले आहे.सध्या नवीन मोटर वाहन कायद्यान्वये वाहनांच्या विविध कागदपत्रांची पुर्तता नसल्यास मोठ्या दंडाची रक्कम भरावी लागते. शिवाय नंदुरबारात वाहन तपासणी मोहिम सुरू असल्यामुळे तरुण, तरुणी, महिला यांचा चालक परवाना काढण्यासाठी देखील गर्दी होत आहे.अशा वेळी नंदुरबारातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात मात्र संबधित अधिकाºयांच्या मनमानीमुळे अनेकवेळा कामकाज बंद ठेवले जात असल्यामुळे नागरिकांना ताटकळत राहावे लागत असते. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार येथे सुरू आहे.कनेक्टीव्हिटी बंदचा बहाणादररोज काही ना काही कारणास्तव अनेकवेळा कामकाज बंद ठेवले जाते. नागरिकांनी विचारणा केली असता आॅनलाईन कामकाजासाठी कनेक्टीव्हिटी नसल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक याच भागात असलेल्या इतर कार्यालयांमध्ये कनेक्टिव्हिटीचा कोणतीही समस्या नसतांना येथेच ही समस्या वारंवार का उद्भवते असा प्रश्न नागरिकांमध्ये आणि कार्यालयातीलच कर्मचाºयांमध्ये देखील उपस्थित केला जात आहे.परंतु कनेक्टिव्हिटी हा नुसताच बहाणा असून खरे कारण कार्यालयातील अधिकाºयांमधील अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे.दिवसभर ताटकळणे...कार्यालयात काम करण्यासाठी येणाºया नागरिकांना वारंवार काम बंद राहत असल्यामुळे या ठिकाणी दिवसभर ताटकळत राहावे लागते. जिल्हाभरातून येणारे नागरिक यामुळे हैराण होतात. यामुळे महिला व तरुणींचा देखील समावेश असतो. आधीच हे कार्यालय शहरापासून लांब अंतरावर असल्यामुळे येण्या-जाण्याच्या दृष्टीने मोठी कसरत होते.सोयीच्या ठिकाणी ड्युटीसोयीच्या ठिकाणी अर्थात नवापूर व गव्हाळी आंतरराज्य चेक नाक्यांवर ड्युटी लावण्यासाठी येथील अधिकाºयांमध्ये चढाओढ असते. त्यातूनच अंतर्गत वाद होतात. ज्यांची वारंवार कार्यालयातच ड्युटी लागते ते मात्र काही ना काही कारण पुढे करून येथे कामकाजावर परिणाम होईल या दृष्टीने पहात असतात असे कार्यालयातीलच कर्मचाºयांमध्ये बोलले जात आहे.काही अधिकाºयांनी देखील या बाबीला दुजोरा दिला आहे. अधिकाºयांच्या या वादात मात्र सर्वसामान्य नागरिक भरडला जात असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात दोन ठिकाणी चेक नाके आहेत. या ठिकाणी ड्युटी लावण्यासाठी निरिक्षक व त्या दर्जाच्या अधिकाºयांमध्ये चढाओढ असते. या कारणावरूनच कार्यालयातील दोन अधिकाºयांमध्ये काही दिवसांपूर्वी वादावादी होऊन प्रकरण फ्रिस्टाईलपर्यंत पोहचले होते. हा प्रकार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत पोहचला आहे. याशिवाय काही नागरिकांनी या ठिकाणी तक्रारी मांडल्या त्याचीही चित्रफित वरिष्ठाकडे पाठविण्यात आल्याचे कार्यालयातून सूत्रांनी स्पष्ट केले.