शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

गावे पाणीदार करण्यासाठी शहाद्यातील ग्रामस्थ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:05 PM

शहादा तालुका : 26 गावांतील ग्रामस्थांना प्रशिक्षण, महिलांचा लक्षणीय सहभाग

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : तालुक्यातील गावे पाणीदार करण्यासाठी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामस्थ गावपातळीवर पाण्याचा प्रत्येक थेंब जिरविण्यासाठी सज्ज होत आहेत. तालुक्यातील 26 गावातील लोकांनी पाणी फाऊंडेशनतर्फर्ेे दिले जाणारे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन गावात प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे. दरम्यान, या उपक्रमांतर्गत गावाच्या विकासासाठी महिलांचा सहभाग वाढत आहे.महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाऊंडेशन काम करीत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून पाणी फाऊंडेशनने काम उभे केले आहे. शहादा तालुक्यातील 60 गावांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. पैकी 10 गावांनी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणा:या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवल्याने असलोद, उधळोद, कहाटूळ, काकर्दा दिगर, चिखली बुद्रुक, पिंपर्डे, लोंढरे, सावखेडा, सावळदा व हिंगणी ही 10 गावे या स्पर्धेतून बाद झाली आहेत. आवगे, ओझर्टा, कमरावद, कवठळ, कवळीथ, कुकावल, कोंढावळ, कोठली त.सा., खेडदिगर, गोगापूर, चिखली खुर्द, चिरखान, जाम, जुनवणे, नवलपूर, पळसवाडा, बिलाडी त.सा.,  बिलाडी त.ह., मलगाव, वडाळी, वाडी, श्रीखेड, सोनवद त.श. व वडगाव या 24 गावांचे प्रशिक्षण अजून बाकी आहे. अनरद, गोदीपूर, धांदरे बुद्रुक, ब्राrाणपुरी, मंदाणे, मोहिदे त.श., मोहिदे त.ह., शोभानगर, होळगुजरी, चांदसैली, तिधारे, दामळदा, दोंदवाडा, नवानगर, निंभोरा, बामखेडा त.त., बोराळे, भुलाणे, भोंगरा, मातकुट, मानमोडय़ा, लंगडी भवानी, लक्कडकोट, शहाणा, सुलतानपूर व दुधखेडा या 24 गावांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने या  गावांमध्ये विविध कामांना सुरुवात झाली आहे.अनेक गावांमध्ये वॉटरकप स्पर्धेबाबत रॅली, ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. लंगडीभवानी येथे पर्यावरण बचावसाठी ढोल वाजवत व विविध घोषणा देत रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप ग्रामसभेत करण्यात आला. या वेळी सुमारे 500 ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच राजेंद्र पावरा, रवींद्र पावरा, शर्मिला पावरा, रमेश पावरा यांनी गावक:यांचे स्वागत केले. बोराळे येथेदेखील ग्रामसभा होऊन वॉटरकप स्पर्धेबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. स्पर्धेपूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थ सरसावले असून वृक्षारोपण, शोषखड्डे, रोपवाटिका, माती  परीक्षण या कामांना जोरात सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही गाव विकासासाठी पदर खोचल्याने महिलांचा सहभाग वाढत आहे.