लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : न्यू.बामखेडा, ता.शहादा येथे कपडे धुण्याचे पाणी उडाल्याच्या कारणावरून तर कोपर्ली येथे किरकोळ कारणावरून दोन गटात जबर हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या. सारंगखेडा व नंदुरबार पोलीसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले.न्यू बामखेडा येथे गाव हाळवर घटना घडली. कल्पनाबाई बाळू ईशी व रंजनाबाई संजय ईशी यांच्यात पाणी उडाल्यावरून वाद झाला. रंजना संजय ईशी यांनी जमाव जमवून कल्पनाबाई ईशी, बाळू ईशी व आणखी एकजण यांना कोयता, काठीने जबर मारहाण केली. त्यात तिघे जखमी झाले. याबाबत कल्पनाबाई ईशी यांच्या फिर्यादीवरून निकिता संजय ईशी, रंजना संजय ईशी, योगेश संजय ईशी, कविता संजय ईशी, राहुल रवींद्र ईशी, अंजना रवींद्र ईशी, माधुरी रवींद्र ईशी, मोन्या नाना कुवर, ईश्वर भुना कोळी, जीवन सुकलाल कोळी सर्व रा.न्यू बामखेडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद रंजनाबाई संजय ईशी यांनी दिली. पाणी उडाल्याच्या कारणावरून केली. त्यांच्या मुलीला जमावाने बेदम मारहाण केली. रंजनाबाई यांच्या फिर्यादीवरून कल्पनाबाई बाळू ईशी, प्रदीप बाळू ईशी, रावसाहेब बाळू ईशी, बाळू तुमडू ईशी, रुपाली रावसाहेब ईशी, विनायक बाळू ईशी सर्व रा.न्यू बामखेडा यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार बागले करीत आहे.कोपर्लीतही हाणामारीदुसरी घटना कोपर्ली येथे घडली. सात जण चोरीच्या इराद्याने घरात घुसल्याच्या कारणावरून जमावाने शकुंतला जगन अहिरे यांना बेदम मारहाण केली. शकुंतलाबाई अहिरे यांनी फिर्याद दिल्याने राजू विठ्ठल अहिरे, किरण अहिरे, राजू आकाश अहिरे, संतोष अहिरे, अविनाश संतोष अहिरे, जयेश अहिरे, सुरेखा संतोष अहिरे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद आकाश राजू अहिरे यांनी दिली. किरकोळ कारणावरून तिघांनी मारहाण केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. आकाश अहिरे यांच्या फिर्यादीवरून शकुंतला जगन अहिरे, जगन पुना अहिरे, जितेंद्र पुना अहिरे सर्व रा.कोपर्ली यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक विठ्ठल मोहोकर, हवालदार अहिरे करीत आहे.
न्यू बामखेडा व कोपर्लीत दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:25 PM