लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय सफाई कामगार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातील वर्ग चार च्या सफाई कर्मचा:यांचा जिल्हा रुग्णालयातर्फे सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचा:यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. डी. सातपुते यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा वळवी, डॉ संजय पटले, डॉ. रविदास वसावे, डॉ. रोहन थोरात, डॉ. अनिल गावित उपस्थित होते. याप्रसंगी सातपुते म्हणाले, घर असो की संस्था प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य असते त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयासह विविध संस्थांमध्ये स्वच्छता कर्मचारी आपले प्राण जोखमीत टाकून स्वच्छतेचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुभाष महिरे यांनी केले. आभार प्रदर्शन किरणबाई ढंडोरे यांनी मानले. कार्यक्रमास कांता वसावे, मंजू वसावे, अंजू पाडवी, रुमा गावित, एच. जी. ङोंडे उपस्थित होते. संयोजन जिल्हा सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय साळुंखे, उपाध्यक्ष दिनेश तेजी, सचिव अजीज शेख, खजिनदार लाखन तेजी, प्रवीण ठाकूर यांनी केले. या कार्यक्रमात छायाबाई ढडोरे, गायत्री साळुंखे, वीरेंद्र ढंडोरे, अमित चनाल, सुरेश पिवाल, प्रितेश बेहरे, विकास ठाकरे पावभा पवार, राकेश ठाकरे, संजय वळवी, जगदीश परदेशी, सुकलाल महाजन, अकरम शेख, रमेश आघाव, भूषण महाले, संदीप कोळी आधी कर्मचा:यांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानाने भारावले सफाई कामगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:42 PM