नवापूर रस्त्यालगत शिवण नदीच्या पात्रात शहरातील परिसरातील नागरिक घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येत असते. यातून निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेमुळे शिवण नदी प्रदूषित होत असल्याचे समोर आले होते. भाविकांनी विसर्जित केलेल्या पीओपीच्या गणेश मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नसल्यामुळे मूर्ती पाण्याबाहेर येऊन त्यांचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने मातृवंदना प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नदी पात्र स्वच्छ करत नागरिकांनी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. यावेळी मातृवंदना प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र माळी, सचिव जगदीश वंजारी, शिवाजी माळी, भूषण माळी, रोहित जैन, हेमंत माळी, ओम माळी, राहुल माळी आदींनी श्रमदान केले. तसेच यापुढे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापन करून आपल्या परिसरातील नदीपात्रांचे संरक्षण करावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले.
मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे शिवण नदीची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:32 AM