लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : प्रकाशा तीर्थक्षेत्री तापी नदीकाठी असलेल्या घाटावर प्रेतावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अस्वच्छ व दरुगधी असलेल्या स्मशानघाट परिसराची कलसाडी येथील तरुणांनी साफसफाई करून आदर्श निर्माण केला.कलसाडी, ता.शहादा येथील माजी आमदार व पुष्पदंतेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक प्रल्हाद भाईदास उर्फ मोहनभाई चौधरी यांच्या पत्नी पार्वताबाई यांचे निधन झाले. त्यांच्यावर प्रकाशा येथे तापी नदीकाठी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी कलसाडी विकास समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी स्मशानघाट व परिसरात असलेली दरुगधी व अस्वच्छता पाहून अंत्यसंस्कारानंतर साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी घाट परिसरातील अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणा:या वस्तू व इतर कचरा गोळा करुन त्याला पेटवून त्याची विल्हेवाट लावली. या आदर्श उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून या कार्यकत्र्यानी एकप्रकारे स्वच्छतेचा मंत्र दिला.या ग्रुपतर्फे गाव परिसरात एक हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन केले जात आहे. गाव परिसरात पाण्याची बिकट स्थिती असल्याने हे तरुण घरुन पाणी नेवून या झाडांना देतात. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तरुणांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक होत आहे. या समितीत राजेंद्र चौधरी, सुनील चौधरी, अरविंद चौधरी, पुंजालाल चौधरी, यशवंत चौधरी, मुकुंद चौधरी, स्वप्नील चौधरी, उमाकांत चौधरी, रमण चौधरी, संजय चौधरी, माणक चौधरी, ईश्वर चौधरी, भावेश चौधरी, दगा चौधरी, जयेश चौधरी आदी 50 जणांचा समावेश आहे. कलसाडी विकास समितीत सुमारे 50 कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या तरुणांनी वर्गणी गोळा करून गावात घरोघरी कचराकुंडय़ा वाटप केल्या आहेत. ग्रामस्थ घरातील कचरा मोठय़ा कचराकुंडीत टाकतात. हा कचरा गावाबाहेर खड्डा करून तेथे टाकला जातो व त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
प्रकाशा स्मशानघाट परिसराची तरुणांकडून साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 1:27 PM