शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

हवामानातील बदलांमुळे रब्बी पेरण्यांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टी आणि अवकाळी पाऊस यातून झालेल्या नुकसानीच्या गर्तेतून शेतकरी बाहेर आले आले असले तरीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीवृष्टी आणि अवकाळी पाऊस यातून झालेल्या नुकसानीच्या गर्तेतून शेतकरी बाहेर आले आले असले तरीही हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे जिल्ह्यातील रब्बी पेरण्यांची गती संथ झाली आहे़ परिणामी डिसेंबर उजाडूनही जिल्ह्यात केवळ १० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे़यंदाच्या रब्बी हंगामात सरासरी ६४ हजार हेक्टरवर गहू, हरभरासह इतर रब्बी पिके पेरणी करण्याचे निर्धारित करण्यात आले होते़ यात हरभरा पेरणी जागोजागी सुरु असली तरी गहू, ज्वारी, मका या पिकांच्या पेरण्या अद्यापही शिल्लक असल्याचे दिसून आले आहे़ शेतकऱ्यांना यंदा बियाणे व खते विनासायस उपलब्ध झाले असले तरी अतीवृष्टीमुळे हंगाम लांबल्याने रब्बीच्या पेरण्या होऊ शकलेले नाहीत़ बºयाच ठिकाणी कापूस अद्यापही शेतात असल्याने शेतकºयांना इतर पिकांची पेरणी करता आलेली नाही़ किमान १ महिना कापूस शेतात राहणार असल्याने रब्बी हंगामही यंदा लांबवणीवर पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी पेरणी क्षेत्र निर्धारित असलेल्या शहादा तालुक्यात अद्याप २६ टक्के पिकांची पेरणी झाली असून यात गहू आणि हरभरा या दोन पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे़जिल्ह्यात आजअखेरीस १० हजार ६३० हेक्टर क्षेत्रात रब्बी पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात १ हजार ५०२, नवापुर तालुक्यात १ हजार ८६३, अक्कलकुवा ५५७, तळोदा ९५२, धडगाव ४३१ तर सर्वाधिक ६ हजार ३२६ हेक्टर शहादा तालुक्यात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ कापूस वेचणी आणि विक्री यात बराच वेळ जात असल्याने शेतकºयांना रब्बी पेरण्यांसाठी वेळच मिळालेला नसल्याने या पेरण्या लांबल्याचे सांगण्यात येत आहे़ यातही नंदुरबार तालुक्यात ७७१ हेक्टर, नवापुर १७६, अक्कलकुवा २०१, शहादा १ हजार १७०, तळोदा १२७ तर धडगाव तालुक्यात १२४ हेक्टरवर गहू पेरा उरकण्यात आला आहे़ अतीवृष्टीचा समावेश असला तरी जिल्ह्यात पाऊस हा सरासरीच्या ११९ टक्के कोसळल्याने २१ हजार १२३ हेक्टरवर गहू पेरणी करण्यात येण्याचे निर्धारण होते़ त्यापैकी अद्याप केवळ २ हजार ५७५ हेक्टरवरच गहू पेरणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातून यंदा किमान ९० टक्क्यांपर्यंत गहू पेरणी होणार असल्याचा अंदाज शेतकºयांचा आहे़ पाण्याची उपलब्ध असली तरी हंगामादरम्यान हवामानात बदल होऊन नुकसानीची भिती असल्याने अनेक शेतकरी इतर पिकांचा आधार घेत आहेत़जिल्ह्यात गहू पाठोपाठ हरभरा पिकावर शेतकºयांचा सर्वाधिक भरवसा आहे़ यंदाच्या हंगामात २० हजार ४०४ हेक्टरवर हरभरा पेरणी होण्याचा अंदाज आहे़ यातही शेतकºयांनी नोव्हेंबरपासून पेरण्यांना वेग दिल्याने जिल्ह्यात ३ हजार ८८७ हेक्टरपर्यंत हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे़ सर्वाधिक १ हजार ७३६ हेक्टर हरभरा शहादा तालुक्यात आहे़ पाण्याच्या उपलब्धतेमुळे आगामी दिवसात हरभरा पेरण्यांना वेग येणार आहे़ यातून १०० टक्क्यांपेक्षा अधिक हरभरा पेरणी पूर्ण करण्यात येणार आहे़ एकीकडे रब्बी कडधान्य आणि धान्य पिकांना महत्त्व असताना करडई, जवस, तीळ, सूर्यफूल ही तेलबिया पिके जवळपास हद्दपार झाल्याचे चित्र शेतीक्षेत्रात आहे़ जिल्ह्यात फक्त १८ हेक्टरवर मोहरीची पेरणी करण्यात आली आहे़