शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
4
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
5
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
6
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
7
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
8
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
9
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
10
"मोबाईल दुरुस्त करा."; १४ वर्षांचा लेकाचा हट्ट; बापाने बेदम मारहाण करून घेतला जीव
11
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
12
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
13
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
15
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
16
'स्त्री 2'मधल्या आयटम साँगला तमन्ना भाटिया देणार होती नकार, म्हणाली, "मला ते गाणं..."
17
Pre Approved Loan : काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
18
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
19
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
20
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."

सलून दुकानदारांनी बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:47 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मिशन बिगीन अगेनच्या दुसºया टप्प्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सलुन दुकाने, ब्युटी पार्लर, बार्बर शॉप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मिशन बिगीन अगेनच्या दुसºया टप्प्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सलुन दुकाने, ब्युटी पार्लर, बार्बर शॉप सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सलून संघटना आणि नाभीक संघ यांनी बैठक घेऊन सदस्यांना दक्षतेच्या सूचना देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांनी एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यांतर्गत एका वेळेस दुकानात दोन किंवा तीन पेक्षा अधिक ग्राहकाना प्रवेश देऊ नये. दुकानात ग्राहकांसाठी ब्लेडचा वापर न करता एकाच वेळी वापरात येणारे युज अँड थ्रो रेझर ब्लेड वापरावेत. दुकानात काम करणाºया कामगार, कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधने लावण्यासह ग्लोव्हज, अ‍ॅप्रॉन व मास्कचा वापर करावा़ प्रत्येक ग्राहकांना सेवा दिल्यानंतर सर्व दुकानातील खुर्च्या व परिसर यांचे निजंर्तुकीकरण करणे बंधनकारक राहील. डिस्पोजल टावेल, नॅपकीनचा वापर ग्राहकांवर करणे बंधनकारक राहील. सेवा देण्यापूर्वी व दिल्यानंतर नॉन डिस्पोजल सामुग्रीचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. सूचनांचे ठळक अक्षरात ग्राहकांना दिसतील असे फलक दुकानात लावावे आदी सूचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास संबधितांविरोधात चौकशी करुन कारवाई करुन दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे़दरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सलून व ब्युटीपार्लर यांचे व्यवसाय करणाºयांचे मोबाईल क्रमांक, दुकानांची माहिती तसेच पत्ते एकत्रित करुन त्याची नोंदवही तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत़ ही दुकाने रविवारपासून सुरु करण्यात आली आहेत़