लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : नंदुरबारातील कोळदे-प्रकाशा मार्गावर सध्या जीवघेणी वाहतूक सुरु असल्याचे वृत्त आह़े या मार्गावर मोठय़ा संख्येने अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आह़ेकाही दिवसांपूर्वीच नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथे गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती़ यात, जीवत हाणी झाली नसली तरी गावाजवळ ट्रक पलटी झाल्याने यातून मोठा अनर्थ टळला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आल़े ट्रक पलटी झाल्यावर ग्रामस्थांनी चालकाला बाहेर काढले होत़े अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणा:या या परिसरात अशा प्रकारे भरधाव वेगाने वाहने चालवण्यात येत असल्याने येथील ग्रामस्थांकडून भिती व्यक्त करण्यात येत आह़े या परिसरातून ट्रक, ट्रक्टर आदी विविध अवजड वाहने ये-जा करीत असतात़ वाहने चालविण्याताना एकमेकांना ओव्हरटेक करण्यात येत असत़े रात्रीच्या वेळी या मार्गावरुन जाणे कठीण होत असत़े या मार्गावर कायमस्वरुपी वाहतूक पोलीस कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े येथे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अवजड वाहनधारकांकडून मनमानी करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत़
कोळदे-प्रकाशा रस्त्यावर जीवघेणी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:09 PM