लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पानबारा ता़ नवापुर येथील सराई नदीच्या अर्धवट बांधलेल्या पुलावरून मालवाहू ट्रक खाली कोसळून झालेल्या गंभीर अपघातात चालक गंभीर जखमी झाला़ बुधवारी दुपारी 3 वाजता ही घडली़ नवापुर तालुक्यातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद आह़े यातून पुलाचे काम अर्धवट आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ट्रक टीएन 52 एफ 1465 हा तामिळनाडू राज्यातून सुरतकडे केबल वायर वाहून नेणारा ट्रक कोंडाईबारी घाटात आला़ पोलीस मदत केंद्रावर या ट्रकला थांबवण्यास सांगण्यात आल़े परंतू चालकाने वाहन न थांबता भरधाव वेगाने दामटला़ ट्रक जुन्या पुलावरून न चालवता अर्धवट बांधकाम असलेल्या पुलावरून चालवला़ यात पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याचे दिसून न आल्याने ट्रक थेट 25 फूट खोलीवर असलेल्या सराई नदीत कोसळला़ यामुळे ट्रकचा चक्काचूर झाला असून बाळकृष्ण सुब्रमण्यम हा गंभीर जखमी झाला आह़े त्याला पोलीसांनी पानबारा येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आह़े याप्रकरणी रात्री उशिरापयर्ंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पुढील तपास पीएसआय चंद्रकांत शिंदे, अतुल पाटील, प्रदीप वाघ करीत आहेत.तीन दिवसांपूर्वी कोंडाईबारी घाटात गंभीर अपघात घडला होता़ त्यापाठोपाठ पुन्हा अपघात घडल्याने चिंता व्यक्त होत आह़े
पुलावरुन ट्रक कोसळल्याने भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:51 AM