लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील कॉलनी व वसाहतींमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्ते अडवले आहेत. बाहेरील कुणाही व्यक्तीला येऊ दिले जात नसल्याची स्थिती आहे. काही कॉलनीतील युवकांनी खडा पहारा देखील देणे सुरू केले आहे.नंदुरबारात रुग्ण आढळताच नागरिकांनी सतर्कता बाळगली आहे. बाहेरील कुणीही व्यक्ती आपल्या वसाहतीत, कॉलनीत, गल्लीत येवू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. कॉलीनत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर आणि इतर आडमार्गावर लाकडाचे ओंडके, टायर लावून रस्ता अडविला जात आहे. काही ठिकाणी काटेरी झुडपे तोडून टाकण्यात आले आहेत. केवळ दूध विक्रेते, पाणी विक्रेते यांनाच येवू दिले जात आहे. तीन दिवस संपुर्ण लॉकडाऊन असल्यामुळे भाजीपाला, फळ विक्रेते देखील फिरकत नसल्याची स्थिती आहे.संपुर्ण लॉकडाऊन उठल्यानंतर देखील काही दिवस कॉलनीचा रस्ता बंद ठेवण्याचे अनेक भागातील रहिवाशांनी स्पष्ट केले आहे. केवळ नियमित येणारे भाजीपाला व फळ विक्रेते आणि पाणी व दूध विक्रेत्यांनाच येवू देण्याचे ठरविण्यात आले आहे.
कॉलनी, वसाहतींचेही रस्ते झाले ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:25 PM