नवापूर : शहरातील नेहरू उद्यान जवळील रंगावली नदीच्या फरशीवर बुधवारी पहाटे चार वाजता गुजरात परिवहन महामंडळाची धावती बस फसली. सुदैवाने सर्व प्रवाशी सुरक्षित राहिलेत. बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अमदाबाद- भुसावळ गुजरात परिवहनच्या बस क्रमांक जीजे 18 - ङोड 2303 च्या चालकाने रंगावली नदीच्या फरशीवरून पाणी वाहत असतांना बस काढण्याचा प्रय} केला. मात्र 17 ऑगस्ट रोजी रंगावली नदीला आलेल्या महापुरात फरशीच्या मध्य भागी पडलेल्या खड्डय़ात धावती बस फसली. या बसमध्ये एकूण 10 प्रवासी होते. खड्डय़ात बस रूतल्याने एकीकडे बसचा तोल गेल्याने झोपेत असलेले प्रवासी घाबरून गेले. स्थानिक लोकांच्या सहकार्याने प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. 17 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी होऊन आज 19 दिवस लोटूनही रंगावली नदीचे पाणी कमी झालेले नाही. फरशीवर पुराच्या पाण्यामुळे मोठा खड्डा पडला असून, या खड्डामध्ये एस.टी. बसचे चाक रूतल्यामुळे बस पुलाच्या मध्यभागी फसल्याचे चित्र रंगावली नदी किनारी राहणा:या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी बस काढण्याचा प्रय} केला. मात्र बस पाण्यातून निघत नसल्याने नागरिकांनी जेसीबी यंत्राव्दारे बसला पाण्याबाहेर काढले.नवापूर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने नेहरू उद्यान जवळील पुलावरील वाहतूक बंद केली होती. मात्र बस चालकाने वेळ वाचवून लवकर निघण्याच्या नादात 10 प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला. दोन वर्षापूर्वी सुरतेकडे जाणारी जालना-सुरत बस फरशीवरुन पाणी जात असतांना अशीच फसली होती. त्यावेळी देखील नवापूर शहरातील नागरिकांनी बस मधील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले होते.
रंगावलीच्या फरशीवर बस खड्डय़ात फसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 11:58 AM