- रमाकांत पाटीललोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबविण्यासाठी गतीमान झालेल्या जिल्ह्यातील चळवळीमुळे जनमानसात उत्साहाचे वातावरण असतांना यंदा पावसाने दगा दिल्याने सर्वाचाच हिरमोड झाला आहे. आत्तापासूनच दुष्काळाची छाया गडद होत असल्याने सर्वाच्याच चेह:यावर चिंतेचे वातावरण आहे. पाण्याचे स्त्रोत ऑक्टोंबर महिन्यातच आटत चालल्याने यंदा काय होईल? ही भिती सर्वानाच सतावत आहे. मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्याचे संकेत दिले असले तरी सरकार दुष्काळाने उद्भवलेले सर्वच प्रश्न सोडवू शकेल अशी स्थिती नाही. त्यामुळे संभाव्य स्थितीवर मात करण्यासाठी आत्तापासूनच सर्वानी जिल्हा प्रशासनाच्या हातात हात घालून त्याचे नियोजन करावे व एकत्र येवून दुष्काळाला हरविण्यासाठी लढाई लढण्याची गरज आहे.जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाचे चित्र पाहिल्यास या पाच वर्षात कधीही सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळाचे चटके कमी अधिक प्रमाणात लोकांना सहन करावे लागले आहे. ही स्थिती पाहता गेल्या दोन वर्षात जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकाराने जलसंधारणाच्या कामासाठी जिल्ह्यात मोठी लोकचळवळ उभी झाली. त्यातून गावा गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. पावसाळ्यापूर्वी रखरखत्या उन्हात लोकांनी घाम गाळून गावातील पाणी गावातच अडविण्यासाठी राब-राब राबले. पण पावसाने दगा दिला. हवामान खात्याने या वर्षी 100 टक्केपेक्षा अधिक पाऊस येईल असे भाकीत केल्याने लोकांना यंदाच्या पावसाळ्याबाबत खूप अपेक्षा होत्या. पण अपेक्षा भंग झाली. समाधानकारक पाऊस न झाल्याने काही ठिकाणी पहिल्या पावसात लोकांनी खोदलेल्या चा:या, तलावात पाणी साचले तर काही ठिकाणी भरलेच नाही. पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात श्रमदानासाठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आमीर खान व रणवीर कपूर दहिंदुले, ता.नंदुरबार येथे आले होते. त्या वेळी या गावातील लोकांच्या उत्साहाला पारावार नव्हता. पण पाऊस न झाल्याने तेथील खोदलेल्या चा:या व तलाव कोरडेच राहिले. अशी स्थिती जिल्ह्यातील अनेक गावांची झाली. सरासरी पेक्षा या वर्षी केवळ 67 टक्के पाऊस झाला. त्यातही हा पाऊस अनियमित व अवेळी झाल्याने त्याचा कुठलाही फायदा झाला नाही. शेतातील पिके फुलो:यावर येण्यापूर्वी अतिशय चांगल्या अवस्थेत होते. त्यामुळे प्रशासनानेदेखील त्यावेळी सव्रेक्षण केलेल्या नजर आणेवारीत तेव्हा सर्वच गावे 50 टक्के पेक्षा वरती आणेवारी असलेली त्यांना आढळून आली. पण त्यानंतर पाऊसच न झाल्याने फुलो:यावर आलेली सर्व पिके कोमेजली. त्यामुळे प्रशासनाला देखील आता अंतिम आणेवारी काढतांना विरूद्ध चित्र दिसून येत आहे. सध्या हे सव्रेक्षण सुरू आहे. त्यात आणेवारी 50 टक्के पेक्षा कमी येईल, असे चित्र स्पष्ट आहे. नव्हे तर केंद्र शासनाच्या सव्रेक्षणातही नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, नवापूर व तळोदा हे चार तालुके दुष्काळ सदृष्य असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य शासनानेही त्यावर मोहर दिली असून, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ असल्याचे मान्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 179 तालुक्यात दुष्काळावर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करणे, शिक्षण शुल्कात सवलत, वीज बिल आणि इतर वसुलींना स्थगिती यासह शेतक:यांच्या हितासाठी विविध निर्णय घेणार असे नऊ सवलती देण्याचे संकेत दिले आहे.जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दुष्काळ जाहीर होण्याची प्रतिक्षा न करता उद्भवणा:या परिस्थितीवर मात करण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्या अंतर्गत त्यांनी चा:यासाठी जिल्हा बंदीचा आदेश यापूर्वीच काढला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गावनिहाय नियोजन सुरू केले आहे. आमदारांच्या उपस्थितीत तालुका निहाय बैठका सुरू आहेत. एकीकडे प्रशासनाचे चांगले रूप पाहायला मिळत असतांना तळोदा तालुक्यात मात्र दुष्काळाच्या बैठकीत अनेक खातेप्रमुखच उपस्थित नसल्याने ती बैठक नव्याने बोलविण्याची नामुष्की प्रशासनावर आली. अर्थात ही सुरूवात आहे. प्रशासनातील चांगले वाईट अनुभव ही नवीबाब नाही. पण या मोहिमेला जर लोकांची साथ मिळाली तर काम न करणा:या अधिका:यांनादेखील लोकांसोबत काम करावेच लागेल. विशेष म्हणजे जिल्ह्याला डॉ.कलशेट्टी सारखे लोकभावना समजून काम करणारे जिल्हाधिकारी लाभल्याने यापूर्वी जसे वृक्षारोपण, तंबाखूमुक्ती, जलसंधारण, पाचोराबारी पुनर्वसन अशा कामांना लोकांची भक्कम साथ मिळवून जिल्ह्यात लोकचळवळ उभी झाली. तशीच चळवळ दुष्काळमुक्तीसाठीही उभी राहणे आवश्यक आहे. आज अनेक गावात दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी अनेक ठिकाणी दीड मीटरपासून तर साडेतीन मीटर्पयत खालावली आहे. मार्च-एप्रिलर्पयत ही अवस्था तर अधिकच दयनिय होणार आहे. शेतक:यांचे हाल आत्तापासून सुरू झाले आहे. शेकडो एकर मिरची, पपई, केळी, ऊस या पिकांना सोडावे लागत असल्याची दुर्देवी अवस्था शेतक:यांवर आली आहे. सायंकाळी पूर्णक्षमतेने चालणारे बोअरचे पाणी दुस:यादिवशी सकाळी त्याच बोअरमधून एक थेंबही पाणी येत नसल्याचे अनुभव गेल्या पंधरवाडय़ात अनेक शेतक:यांनी घेतला आणि लाखो रूपये खर्च करून जगविलेले पीक सोडावे लागण्याची अवस्था त्यांची झाली आहे. खरीपाचे पीक 70 टक्के वाया गेले. अशा स्थितीत त्यांची अवस्था केवीलवाणी झाली आहे. अशा अवस्थेत गेल्या वर्षी बोंडअळीने नुकसानीचे जाहीर केलेले अनुदान शेतक:यांना अद्याप मिळालेले नाही. हे अनुदान तत्काळ मिळाल्यास शेतक:यांना तो एक आधार होईल. त्यासाठी प्रशासन व लोक प्रतिनिधींचा पुढाकार आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुक्ष्म आराखडा तयार करण्याची गरज आहे. ऐरवी नेहमी प्रमाणे तीन टप्प्यातील पाणीटंचाई आराखडय़ाचे सूत्र मोडून गावातील प्रत्यक्ष स्थिती लक्षात घेवून त्यावर तत्काळ प्रश्न सोडविण्याची गरज आहे. टँकरने पुरवठा आवश्यक असेल तर उगीच टँकरमुक्तीचा कांगावा करण्यापेक्षा तत्काळ टँकर सुरू करून लोकांना पाणी देण्याची आवश्यकता आहे. आजही नंदुरबार, शहादा आणि धडगाव तालुक्यातील अनेक गावातील लोकांना जंगलातून पाणी आणावे लागत आहे. लोकांचे हे दु:ख हलके करण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न जसा-जसा गंभीर होत जाईल तस-तसा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोजगारावर वेळीच उपाययोजना आवश्यक आहे. एकूणच संभाव्य परिस्थितीचा आढावा घेवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सुक्ष्मनियोजन आवश्यक असून, त्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकांनीही तेवढय़ाच ताकदीने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे.
चला,दुष्काळावर मात करण्यासाठी एकवटू या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:34 AM