नंदुरबार : शहरातील सीबी गार्डन येथे सोमवारी झालेल्या हाणामारीनंतर मंगळवारी पहाटे 17 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मारहाणीत जखमी झालेल्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ सोमवारी वाघोदा शिवारालगत असलेल्या सीबी गार्डन येथे किरकोळ वादातून हाणामारी झाली होती़ यात 10 ते 15 जणांच्या टोळक्याने गाडय़ांची तोडफोड केली होती़ या घटनेत सय्यद रिजवाल अली सय्यद रहेमतअली या युवकास लोखंडी रॉड आणि हॉकी स्टीकने जबर मारहाण करण्यात आल्याने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े घटनेनंतर या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ जखमी रिजवानअली रहेमतअली याने मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली़ या फिर्यादीनुसार सीबी गार्डनमध्ये सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गार्डनमध्ये गेलो असताना तेथील कर्मचा:यासोबत काही युवकांचा वाद झाला़ यातून माळी नामक कर्मचा:यासह आणखी 15 ते 16 जणांच्या जमावाले हॉकी, स्टीक, लोखंडी रॉड, लाठय़ा-काठय़ा याद्वारे मारहाण केली़ यावेळी संबधितांनी खिशातील साडेतीन हजार रूपये देखील काढून नेले होत़े दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बच्छाव करत आहेत़ मारहाणीच्या घटनेदरम्यान सीबी गार्डनसह परिसरात तोडफोड करण्यात आली होती़ या घटनेमुळे वाघोदा शिवारातील विविध रहिवासी वसाहतींसह धावपळ होऊन घबराट पसरली होती़ घटनेनंतर बघ्यांची गर्दीही येथे जमा झाली होती़ सीबी गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा वाद झाल्याची माहिती आह़े वादादरम्यान झालेल्या हाणामारीत वाहनांसह खाद्यपदार्थाच्या गाडय़ा आणि दुचाकी वाहनांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े वॉटरपार्क परिसरात हुल्लडबाजी करणा:या युवकांना समज देत असताना हा वाद घडला़ घटनेनंतर शहरातील विविध भागात अफवांचे पीक आले होत़े अफवांमुळे काहींनी सीबी गार्डनकडे धाव घेतली होती़ उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार उशिरार्पयत येथे तळ ठोकून होत़े
सीबी गार्डन हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:45 PM