लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील वेलखेडी-सांबर ते मांडवा रस्त्यासह फरशी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार डेब्रामाळचे सरपंच भीमसिंग राजा वळवी यांनी केली आहे.सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेलखेडी-सांबर ते मांडवा या रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. वेलखेडी-सांबर ते बुदेमालपाडा-पळासखोब्रा असा तयार करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून रस्त्यादरम्यान येणाऱ्या लहान पुलांचे संरक्षक कठड्यांचे कामही योग होत नसल्याची तक्रार डेब्रामाळचे सरपंच भीमस्ीिंग राजा वळवी यांनी केली आहे. या रस्त्याचे काम कुठली एजन्सी करीत आहे, कोणाच्या नियंत्रणाखाली काम होत आहे यासंबंधी काहीही माहिती मिळत नसल्याने व कामासंदर्भात माहितीचा फलकही लावण्यात आला नसून रस्त्याच्या माहितीसंदर्भात फलक लावण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून चांगल्या दर्जाचे काम करण्याची मागणी सरपंच वळवी यांनी केली आहे.
वेलखेडी-मांडवा रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 12:46 PM