शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

मालमत्तापत्रकासाठी 11 गावांचे सव्रेक्षण सिमांकन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:03 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील ग्रामीण भागात जीआयएस आधारित सव्रेक्षण व मॅपिंग करुन नगरपालिकांप्रमाणे मालमत्तापत्रक देण्याचा निर्णय घेतला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील ग्रामीण भागात जीआयएस आधारित सव्रेक्षण व मॅपिंग करुन नगरपालिकांप्रमाणे मालमत्तापत्रक देण्याचा निर्णय घेतला गेला होता़ या निर्णयानुसार जिल्ह्यात 51 गावांची निवड करुन सव्रेक्षणाला सुरुवात झाली होती़ यांतर्गत 30 जूनअखेर 11 गावांचे सव्रेक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या सिमा निश्चित करुन नकाशे तयार झाले आहेत़    नंदुरबार जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार ग्रामीण मालमत्ताधारकांना नमुना आठऐवजी मालमत्तापत्रक देण्याची कारवाई गेल्या मे महिन्यापासून सुरु करण्यात आली होती़ यांतर्गत पहिल्या टप्प्यात 51 गावांची निवड झाली होती़ नंदुरबार, नवापुर, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येकी 10 तर धडगाव तालुक्यात 1 अशा 51 गावात हे सव्रेक्षण सुरु होत़े  भूमीअभिलेख विभागाकडून नियुक्त करण्यात आलेल्या गावांमध्ये प्रथम टप्प्यात ग्रामसभा घेण्यात येऊन ग्रामस्थांना ड्रोन सव्रेक्षणाची माहिती देऊन मोजमाप पूर्ण करण्यात आले आह़े येत्या 15 दिवसात 16 गावांमध्ये सव्रेक्षण पूर्ण होणार असून त्यानंतर निर्धारित केलेल्या सर्व 51 गावांमध्ये सव्रेक्षण पूर्ण करुन कारवाई होणार आह़े 51 गावांमध्ये कामकाज पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर 900 महसूली गावांमध्ये सव्रेक्षणाला प्रारंभ होणार आह़े नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, वाघोदे, नळवे खुर्द, धमडाई, पथराई, लोणखेडा, पळाशी, दुधाळे, राकसवाडे, नवापुर तालुक्यात निंबोणी, नगारे, पिंपळे, कारेघाट,  नांदवण, कासारे, शहादा तालुक्यातील अलखेड, लोहारे, मनरद, सोनवद तर्फे शहादा, औरंगपूर, मलगाव, मानमोडय़ा, कुकावल, तळोदा तालुक्यातील त:हावद, खेडले, धानोरा, रांझणी, सोमावल बुद्रुक, नर्मदानगर, कढेल, आष्टे तर्फे बोरद, उमरी, अक्कलकुवा तालुक्यातील कोराई, मक्राणीफळी, मिठय़ाफळी, वाण्याविहिर खुर्द, सोरापाडा, गंगापूर, वाण्याविहिर बुद्रुक, राजमोही मोठी, राजमोही लहान, देवमोगरा नगर तर धडगाव तालुक्यातील तोरणमाळ याठिकाणी सव्रेक्षण सुरु असल्याची माहिती आह़े शासनाकडून होणा:या या मोजणीमुळे शासकीय मिळकतीचे संरक्षण, मिळकतीचा नकाशा व सीमा निश्चिती, मिळकतीच्या नेमक्या छायाचित्राची माहिती, मालकी हक्काचे अभिलेख मिळकत पत्रिका, ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण, गावातील रस्त्यांचे अचूक नकाशे, नाल्यांच्या सीमा निश्चिती होऊन अतिक्रमणाला चाप बसणार आह़े तसेच मिळकत पत्रिकेमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना घरांवर कर्ज घेणे सुलभ होणार आह़े

भूमि अभिलेख विभागाच्या पथकाने नंदुरबार तालुक्यात उमर्दे, नवापुर- पानबारा, निमदर्डा, खोकसा, पिंप्राण, सुळी, अक्कलकुवा-कौलीगव्हाण, गलोठा, तळोदा-दसवड तर शहादा तालुक्यातील सावखेडा आणि मोहिदे तर्फे हवेली या गावांमध्ये ड्रोनद्वारे सव्रेक्षण करुन गाव नकाशे तयार करण्याच्या कामांना वेग देण्यात आला होता़ गावातील रस्ते, सार्वजनिक जागा, मालमत्ता, पडीक जागा, ग्रामपंचायत मालकीच्या जागा व इमारती यांचे मोजमाप करुन गावांच्या सिमा निश्चित करण्यात आल्या आहेत़ लवकरच नागरिकांना हे नकाशे पाहण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे भूमिअभिलेख विभागाने म्हटले आह़े 

पहिल्यात टप्प्यात भूमिअभिलेख विभागाने नंदुरबार तालुक्यात निवड केलेले सर्व 10, नवापुर 6, शहादा 9, तळोदा 4, अक्कलकुवा 3 तर धडगाव तालुक्यातील एका गावात ग्रामसभा झाली आह़े येथे मालमत्तापत्रक आणि ड्रोन सव्रेक्षण याची माहिती देण्यात आली़  ग्रामस्थांनी या कामकाजाचे स्वागत करत सव्रेक्षणाला मान्यता दिल्याची माहिती आह़े यानंतर या गावांमध्ये ड्रोनद्वारे सव्रेक्षणाला सुरुवात झाली होती़ येत्या काळात 18 गावांमध्ये ग्रामसभा होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े सिमांकन पूर्ण झालेल्या 11 गावांव्यतिरिक्त नंदुरबार 4, नवापुर 1, शहादा 7, तळोदा तर अक्कलकुवा तालुक्यात एक अशा 16 गावांमध्ये ग्रामसभा पूर्ण होऊन सिमांकनाचे काम अंतिम टप्प्यात सुरु आह़े यातही जिल्ह्यात निवड केलेल्या 23 गावांमध्ये ग्रामसभा पूर्ण होऊन सिमांकन सुरु झालेले नाही़ यात सर्वाधिक सात गावे ही अक्कलकुवा तालुक्यातील आहेत़