लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : 31 मार्चपूर्वी जलयुक्तची सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिका:यांना दिल्या़जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होत़े या वेळी ते बोलत होत़े या वेळी रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी डॉ़ अर्चना पठारे, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी रमेश शिंदे, तहसीलदार नितीन पाटील, गटविकास अधिकारी उदय कुसूरकर, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले आदी उपस्थित होत़े नंदुरबार तालुक्यातील कार्ली, होळतर्फे हवेली, वैदाणे, भादवड, खोक्राळे, न्याहली, शनिमांडळ, रनाळे, ढंढाणे, वनकुटे, रजाळे, घोटाणे, मांजरे, काकर्दे, आदी गावातीलकामे मार्चर्पयत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या़ कामे ठेकेदारी पध्दतीने न करता गावांच्या सहकार्याने झाली पाहिजेत त्यासाठी सर्वानी पुढे यावे असे आवाहनही डॉ़ कलशेट्टी यांनी केल़े
मार्चअखेरीस जलयुक्तची कामे पूर्ण करा : नंदुरबार तालुका बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:11 PM