नंदुरबार : जिल्ह्यातील 104 गावांमध्ये 2017-18 या वर्षात जलसंधारणाची 2 हजार 228 कामे घेण्यात आली होती़ यातील 1 हजार 585 कामे आजअखेरीस पूर्ण झाल्याची माहिती आह़े या कामांबाबत सातत्याने झालेल्या तक्रारी आणि चौकशीचे गोपनिय अहवाल यामुळे गेल्या वर्षात जलयुक्त योजना चर्चेत होती़ 9 विभागांनी ही कामे पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाचा आह़े राज्यात 2015-16 या आर्थिक वर्षापासून जलयुक्त शिवाराची कामे सुरू करण्यात आली होती़ जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात 2 हजार 817 कामे जलयुक्तच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती आह़े कृषी विभाग, लघुसिंचन, जलसंधारण, वनविभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सव्रेक्षण यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या 9 विभागांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ही कामे राबवण्यात आली होती़ अनघड दगडी बांध, कंपार्टमेन्ट बंडीग, कोल्हापूर टाईप बंधारा/साठवण बंधारा दुरुस्ती, खोल सलग समतल चर, सिमेंट बंधारा/माती नाला बांध याच्यातून गाळ काढणे, गॅबियन बंधारे, जुने सिमेंट काँक्रिट नाला बांध, जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व माती नाला बांध, नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, मातीचा बांध बांधणे, नैसर्गिक जलस्त्रोत बळकटीकरण, पुर्नभरण चर यासह विविध प्रकारची कामे या विभागांकडून पूर्ण झाल्याची माहिती आह़े यासाठी गेल्या वर्षात 27 कोटी 55 लाख 58 हजार रूपयांचा खर्च केल्याची माहिती आह़े 2017-18 या वर्षात कृषी विभाग 1 हजार 120, लघुसिंचन 235, जलसंधारण 170, वनविभाग 125, सामाजिक वनीकरण 11, भूजल सव्रेक्षण विभाग 239, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि नरेगा 127 तर इतर विभागांकडून 12 जलयुक्तची कामे मंजूर करण्यात आली होती़ या 2 हजार 39 कामांपैकी 2 हजार 161 कामांना प्रथम मान्यता देण्यात आली होती़ यातील 2 हजार 119 कामांना कार्यारंभ आदेश दिले गेल़े ही कामे सुरू झाल्यानंतर 1 हजार 585 कामे पूर्ण तर 454 कामे अद्यापही प्रगती पथावर असल्याचे सांगण्यात आले आह़े एकीकडे प्रशासनाने गेल्या वर्षात विविध विभागांकडून कामे पूर्ण करून घेतल्याचे म्हटले असले तरी यात कृषी विभागाने 107 कामे रद्द केली होती़ ही कामे रद्द करण्याची माहिती ही प्रशासकीय पातळीवर दिली गेली असल्याचे सांगण्यात आले आह़े याचप्रकारे वनविभागाने 35 कामे अद्यापही सुरूच केलेली नाहीत़ यामुळे जलयुक्तची 174 मंजूर असलेली कामे रखडली आहेत़ येत्या वर्षात विविध 9 विभागांकडून 189 गावांमध्ये जलयुक्त अभियानाची तयारी सुरू झाली आह़े यानुसार अंतिम आराखडा तयार करण्याच्या कामेही अंतिम टप्प्यात आहेत़ जिल्ह्यात गेल्या 2015 ते 2017 या काळात 3 हजार 3 हजार 72 कामांचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला होता़ यात 3072 कामांना प्रथम मान्यता देण्यात आली होती़ यातील 2 हजार 817 कामे नोव्हेंबर 2017 र्पयत पूर्ण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळवले होत़े परंतू यातील 255 कामे आजही अपूर्ण असल्याची माहिती असून नेमक्या कोणत्या विभागातील कामांना गती मिळालेली नाही़ याबाबत माहिती प्रशासनाकडून कडून मिळालेली नाही़अक्कलकुवा तालुक्यात गत तीन वर्षात मंजूर 814 कामांपैकी 777 पूर्ण तर 37 अपूर्ण आहेत़ धडगाव तालुक्यात 2015 ते 2017 या काळात केवळ 60 कामे मंजूर होती़ यातील 49 पूर्ण तर 11 अपूर्ण आहेत़ नंदुरबार 442 पैकी 369 पूर्ण तर 73 अपूर्ण आहेत़ नवापूर 1 हजार 169 पैकी 1 हजार 54 पूर्ण तर 115 कामे अद्यापही सुरूच आहेत़ तर शहादा तालुक्यात 587 पैकी 568 कामे पूर्ण असून 19 कामे अपूर्ण असल्याचा दावा करण्यात आला आह़े 2017-18 या वर्षात धडगाव तालुक्यात 18, नंदुरबार 21, शहादा 15, तळोदा 8, अक्कलकुवा 20 तर नवापूर तालुक्यातील 22 गावांमध्ये जलयुक्त शिवाराच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती़ या गावांमध्ये 1 हजार 585 कामांना पूर्णत्त्व आल्याचे सांगण्यात आले आह़े
वर्षभरात जलयुक्तची दीड हजार कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 5:32 PM