नंदुरबार : केंद्रशासनाने घोषित केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत नंदुरबार तालुक्यात १८ शेतकरी कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे़ या कुटूंबांना वार्षिक सहा हजार रुपये प्रमाणे पहिल्या टप्प्यात रक्कम मिळण्याचा मार्ग यातून मोकळा झाला आहे़दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र, अल्पभूधारक तसेच वनपट्टेधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर नंदुरबार तालुक्यातील १५४ गावांमध्ये सर्वेक्षण कामाला गती आली होती़ नंदुरबार तहसील कार्यालयाच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसांपासून सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले होते़ तालुक्यातील ४० हजार शेतकरी कुटूंबांचे केंद्र सरकारच्या निकषानुसार पडताळणी करुन याद्या तयार करण्याचे आदेश असल्याने कामकाजाला वेग आला होता़ यासाठी तहसीलदार नितीन पाटील यांनी गावनिहाय सर्वेक्षणासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि सरपंच यांचा समावेश असलेल्या ग्रामस्तरीय समित्यांची नियुक्ती केली होती़ प्रत्येक गावासाठी एक याप्रमाणे कार्य करणाºया या समित्यांनी गेल्या आठ दिवसात घरोघरी चौकशी करुन अर्ज भरुन घेतले आहेत़ चौकशी करण्यात आलेले सर्वच शेतकरी सन्मानाला पात्र ठरणार असल्याचे सांगण्यात आले असून येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत याद्या पूर्ण करावयाच्या असल्याची माहिती देण्यात आली आहे़ समितीकडून आधार आणि बँक खातेक्रमाकांची पडताळणी करुन, घरात शासकीय नोकरी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत नसल्याचे पुरावे घेतले जात आहे़ महसूल आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने तयार होणाºया या याद्यांमुळे दुष्काळमदतनिधी वाटपही सोयीचे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
नंदुरबार तालुक्यात १८ हजार शेतकरी कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:25 AM