लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केतन दिलीपसिंह रघुवंशी यांना सोमवारी अटक झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी 6 रोजी रघुवंशी समर्थकांनी नंदुरबार बंदची हाक दिली़ याला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आल़े सकाळपासून नंदुरबार शहरात ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता़दरम्यान, शिवजयंतीनिमित्त वादग्रस्त पोस्टर्स काढणा:या पोलीस कर्मचा:याला धक्काबुकी केल्याप्रकरणी केतन रघुवंशी यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली होती़ शिवजयंतीनिमित्त रघुवंशी यांनी परदेशीपुरा भागात वादग्रस्त पोस्टर्स लावले होते. ते काढण्यासाठी हवालदार सूरज सोनवणे हे गेले असता त्यांना केतन रघुवंशी यांनी विरोध केला. त्यांना धक्काबुकी देखील केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी हवालदार सोनवणे यांनी शहर पोलिसात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ रघुवंशी यांना सोमवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्यामुळे समर्थकांनी मंगळवारी सकाळपासून नंदुरबार बंदची हाक दिली होती़ शहरात विविध संवेदनशिल ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आह़े
नंदुरबारात बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:49 AM