लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात खोदण्यात आलेल्या 94 लाख खड्डय़ात लागवड होणा:या वृक्षांच्या वाढीची स्थिती नागरिकांना केवळ एका क्लिकवर समजून येणार आह़े वनविभागाने जिल्ह्यात खोदलेल्या 94 लाख खड्डय़ांचे जिओ टॅगिंग केल्याने हे शक्य झाले आह़े राज्य शासनाकडून राबवण्यात येणा:या 33 कोटी वृक्ष लागवडींतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 94 लाख 57 हजार झाडांच्या लागवडीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आह़े ठाणेपाडा येथील रोपवाटिकेत सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आह़े राज्यात सर्वत्र एकाच दिवशी झालेल्या या उपक्रमापूर्वी ड्रोन मॅपिंग आणि जिओ टॅगिंग ही कारवाई पूर्ण करण्यात आली होती़ गेल्या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात केवळ नवापुर आणि नंदुरबार वनक्षेत्रातील खड्डय़ांचे जिओ टॅगिंग करुन माहिती वनविभागाच्या अॅपवर अपलोड केली गेली होती़ परंतू यंदा नंदुरबार व नवापुरसह शहादा, तळोदा मेवासी, अक्कलकुवा, धडगाव, तोरणमाळ या जिल्ह्यातील सर्वच वनक्षेत्रात रोपांची लागवड होणा:या सर्व 6 हजार 600 ठिकाणी ड्रोनद्वारे मॅपिंग करुन तेथील 94 लाख खड्डय़ांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आह़े यामुळे जिल्ह्यातील एकूणएक खड्डा गुगल अर्थवर उपलब्ध झाला आह़े यामुळे निर्धारित केलेल्या क्षेत्रात रोपांची लागवड झाली किंवा कसे ही स्थिती तात्काळ समजून आढावा घेणेही सोपे होणार आह़े यासाठी वनविभागाने विकसित केलेले वनविभागाचे स्वतंत्र अॅप जिल्ह्यातील अधिका:यांच्या मोबाईलमध्ये अपलोड केले गेले असल्याने वेळावेळी खड्डय़ातील वृक्ष लागवडीचा आढावा घेऊन कामकाज शक्य होणार आह़े
नंदुरबार जिल्ह्याला यंदा 91 लाख 44 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्टय़ वनविभागाने दिले होते तत्पूर्वी जिल्ह्यात 94 लाख खड्डे खोदले गेल्याने लागवड उद्दीष्टात वाढ झाली होती़ खोदलेल्या प्रत्येक खड्डय़ाचा अक्षांश, रेखांश, समुद्रसपाटीपासून उंची, जागेची अचूकता, वेळ आणि स्थळ असा ड्रोनद्वारे फोटो काढून त्याची गुगलअर्थवर नोंद केली गेली आह़े संबधित खड्डय़ात झाड लावल्यानंतर वनविभागाच्या अॅपवर सर्च केल्यास झाडाची स्थिती आणि त्याबाबत माहिती देण्यासाठी त्या-त्या परिसरात नियुक्त समन्वयक वनकर्मचारी यांचा संपर्क क्रमांक येणार आह़े गेल्या वर्षात नंदुरबार जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या 54 लाख झाडांपैकी सरासरी 70 टक्के झाडांची स्थिती वर्षभरानंतर चांगली आह़े मर आलेल्या 30 झाडांचे पुनरुज्जीवन शक्य नसल्याने यंदाच्या वर्षात त्याठिकाणी पुन्हा नव्याने खड्डे खोदून तयार आहेत़ या जागांचे जिओ टॅगिंग झाल्याने येत्या काळातील तेथील झाडांची वाढ नेमकी कशी आहे, हे जाणून घेणे शक्य होणार असल्याने वृक्ष लागवड कार्यक्रमात पारदर्शकता येणार असल्याची अपेक्षा आह़े
नंदुरबार आणि नवापुर या वनक्षेत्रात वनविभागाने गेल्या वर्षी केलेल्या जिओ टॅगिंगमुळे तेथे 100 टक्के लागवड झाली होती़ नुकत्याच चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील जिओ टॅगिंगच्या कामांचे कौतूक करण्यात येऊन यंदाच्या खड्डे खोदकामाचा आढावा घेण्यात आला़ गेल्या वर्षी केवळ नाशिक विभागात केवळ नंदुरबार जिल्ह्यात खड्डय़ांचे जिओ टॅगींग झाले होत़े दरम्यान सोमवारपासून पुढील तीन महिने सुरु राहणा:या वृक्षलागवड कार्यक्रमासाठी 159 रोपवाटिकांतून झाडांचा पुरवठा त्या-त्या ठिकाणी करण्यास सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आह़े