लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पराभवाचे आत्मपरीक्षण व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नियोजन करण्यासाठी तळोदा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकत्र्याची बैठक पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली.बैठकीला माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, सतीश वळवी, सुरेश इंद्रजित, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, नगरसेवक गौरव वाणी, पं.स. सभापती शांताबाई पवार, उपसभापती दीपक वळवी, सदस्य वेस्ता पावरा, शानूबाई वळवी, आकाश वळवी , गौतम जैन, जि.प. सदस्य नरहर ठाकरे, संदीप परदेशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते . तालुक्यातील गाव व बुथनिहाय झालेले मतदान यांचे वाचन करण्यात आले. ज्या गावात काँग्रेसला कमी मते मिळालीत त्यांची कारणमीमांसा करण्यात आली. तालुक्यातील ज्या गावात काँग्रेसची पिछेहाट झाली त्या गावात कार्यकत्र्यानी लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन अॅड.पद्माकर वळवी यांनी केले. जनतेचे प्रश्न कार्यकत्र्यानी प्राधान्याने सोडविण्यावर भर द्यावा, असे कार्यकत्र्याना सांगण्यात आले. याशिवाय नवीन युवक मतदारांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असा सूर बैठकीत उमटला. बैठकीत कार्यकत्र्याच्या तक्रारी व सूचनांवर चर्चा करण्यात आली. युवकांना काँग्रेसच्या प्रवाहात आणण्यासाठी गाव पातळीवर राजीव गांधी युवक मंडळाची स्थापना तालुक्यात करण्यात येईल, असे अॅड.वळवी यांनी यावेळी सांगितले.
तळोद्यात काँग्रेसची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:24 PM