लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात प्रवेश करीत असल्यामुळे त्यांची पहिली सभा नंदुरबारात घ्यावी यासाठी काँग्रेस नेते प्रय}शील आहेत. नंदुरबारातून काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना ई-मेल व फॅक्स देखील पाठविण्यात आले असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.गांधी घराणे आणि नंदुरबार यांचे पूर्वीपासून अतूट नाते आहे. स्व.इंदिरा गांधी यांची खांडबारा येथील सभा, स्व.राजीव गांधी व खासदार सोनिया गांधी यांची नंदुरबारातील सभा त्याच्या साक्षीदार आहेत. या नेत्यांनी प्रचाराचा शुभारंभ नंदुरबारातून केल्यानंतर यश आले आहे. त्यामुळे आता प्रियंका गांधी देखील सक्रीय राजकारणात सहभागी होत असल्यामुळे त्यांची पहिली सभा नंदुरबार जिल्ह्यात घ्यावी यासाठी काँग्रेस नेते प्रय}शील आहेत. खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या दोन्ही नेत्यांनी ई-मेल व फॅक्सद्वारे पत्र पाठविले आहे. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काहीही उत्तर मिळालेले नाही. प्रियंका गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी देखील काँग्रेस नेते प्रय}शील आहेत. यामुळे मात्र, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकत्र्यामुळे निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर उत्साह निर्माण झाला असून प्रियंका गांधी यांची सभा होते किंवा कसे याकडे आता काँग्रेसह सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.
प्रियंकांच्या सभेसाठी काँग्रेसच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 4:19 PM