नंदुरबार : लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे नंदुरबार मतदारसंघाकरिता आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत या दोन उमेदवारांची नावे आज पक्षाकडे देण्यात आले आह़े मुंबईत झालेल्या बैठकीत ही नावे देण्यात आली़ लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांतर्फे निवडणूक तयारीला जोर आला आह़े विद्यमान खासदार डॉ़ हीना गावीत ह्या भाजपतर्फेच पुन्हा उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहिर केले आह़े यापाश्र्वभूमीवर काँग्रेसतर्फे उमेदवार कोण, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता लागून होती़ गेल्या महिन्याभरापासून नंदुरबार मतदारसंघावर राष्ट्रवादीनेही दावा केल्याने याठिकाणी काँग्रेस की राष्ट्रवादी असाही प्रश्न चर्चेत होता़ मात्र येथील जागा काँग्रेसलाच मिळाली आह़े या पाश्र्वभूमीवर रविवारी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नंदुरबार मतदार संघातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती़ यावेळी आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार अॅड़क़ेसी़पाडवी, आमदार डी़एस़अहिरे, आमदार काशिराम पावरा, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी, आदिवासी कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत हे उपस्थित होत़े यावेळी सर्वानुमते संभाव्य उमेदवारीसाठी काँग्रेसतर्फे आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी व भरत गावीत या दोघांची नावे देण्यात आली आहेत़
काँग्रेसतर्फे लोकसभेसाठी नंदुरबारमधून क़ेसी़पाडवी व भरत गावीतांचे नाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:04 PM