ऑनलाइन लोकमतकोठार, जि. नंदुरबार, दि. 6 -तापी नदीवरील गुजरात राज्याच्या हद्दीत असणा:या बहुप्रतीक्षित हातोडा पुलाच्या उद्घाटनाच्या संभाव्य तारखेने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आह़े निर्धारित वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने पुलाचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आह़ेएप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आमदार उदेसिंग पाडवी यांनी बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचा:यांसह हातोडा पुलाची पाहणी केली होती़ त्यावेळी एस.- तीन या स्लॅबचे काम सरू होत़े मात्र पुलाचे पूर्ण काम 15 एप्रिलर्पयत पूर्ण होईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल पावर व त्यांच्या सहाका:यांनी पुलाच्या पाहणीला आलेल्या आमदार पाडवी व पदाधिका:यांना दिले होत़े त्यांच्या आश्वासनानुसार आमदार पाडवी यांनी कोणत्याही परिस्थितीत मे महिन्याचा पहिल्या आठवडय़ात या पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती दिली होती़ मात्र मात्र अद्याप याबाबत कुठलीच हालचाल दिसून येत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़ पुलाला सुमारे 58 कोटी 40 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आह़े नदीत असलेल्या पाण्यामुळे पुलाचा कामाची मुदत अनेकदा वाढवून घ्यावी लागली आह़े पुल बांधताना तापी नदीत असलेल्या पाणी साठय़ाचा विचार केला नसल्याचा आरोप करण्यात येत आह़े नदीत पावसाळा व हिवाळ्यात भरपूर पाणीसाठा असतो़ त्यामुळे ठेकेदाराला काम करणेही सोयी नसत़े केवळ उन्हाळ्यातील तीन चार महिने काम करण्यात येत असत़े या कामाचा कालावधी 2009 ते 2011 पावसाळ्यासह देण्यात आला होता़ पुन्हा 2011 ते 2012 असा कालावधी वाढविण्यत आला़ नदीत मोठय़ा प्रमाणात असणा:या पाणीसाठय़ामुळे कामा निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही़ त्यासाठी 3 मार्च 2017 च्या आदेशान्वये 31 मार्चर्पयत सुधारित मुदत वाढविण्यात आली आह़े या उन्हाळ्यात तापी नदीतला पाणीसाठी कमी झाल्यामुळे पुलाचे काम युध्दपातळीवर राबविण्यात आल़े तळोदा धडगाव तालुक्याला कमी वेळात जोडणारा हा पुल असून यामुळे या भागातील नागरिकांचा वेळ व पैसाही मोठय़ा प्रमाणात वाचणार असल्याने याला मोठे महत्व आह़े तळोदा ते नंदुरबार हे अंतर सुमारे 15 किमीने कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे तळोदा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील गाव व पाडे ही कमी वेळेच्या अंतरात जिल्ह्याला जोडला जाणार आह़े सोबच पुलाच्या पूर्णत्वामुळे दळणवळनाच्या सोयी उपलब्ध होऊन या दोन्ही तालुक्यांच्या औद्योगिक विकासालादेखील चालना मिळणार आह़े
गुजरातला जोडणा:या पुलाचे काम रखडले
By admin | Published: May 06, 2017 7:00 PM