नंदुरबार : भारतीय शेतक:यांना रासायनिक व हायब्रिड शेतीची सवय लावून देशाची व्यवस्थाच खिळखिळ करण्याची विदेशी कंपनींचे षडयंत्र असून त्यापासून भारतीय शेतक:यांनी सावध रहाव़े देशातील कृषी विद्यापीठांनी त्याकरीता नैसर्गिक शेतीचा व देशी वानांचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी येथे केल़े नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे बीज स्वावलंबन हेतु गठबंधन या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आह़े त्याचे उद्घाटन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते झाल़े या वेळी भारत सरकारचा कृषक वाण व अधिकार जतन प्राधिकरणाचे रजिस्टार डॉ़ आऱसी़ अग्रवाल, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ पी़ विश्वनाथा, हेडगेवार समितीचे डॉ़ गजानन डांगे, कृष्णदास पाटील, जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलेशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील हे उपस्थित होत़े या वेळी बोलताना आचार्य देवव्रत यांनी सांगितले की, आज रासायनिक शेती व हायब्रिड वाणामुळे शेतीचे उत्पादन निश्चित वाढले असले तरी, त्यामुळे शेती निकस होत असून या धान्यामुळे कँन्सर, मधुमेह, हार्ट अॅटॅकसारखे आजार वाढले आहेत़ देशात रुग्णालयांची संख्या जशी वाढते आहे, त्याच्या कित्येक पटीने रुग्णांची संख्याही वाढते आह़े त्याला कारण हेच आह़े त्यामुळे यापासून बचाव करायचा असेल तर, नैसर्गिक शेती आणि देशी वाण हाच पर्याय आह़े आपण स्वत: आपल्या 200 एकर शेतीवर गेल्या 10 वर्षापासून असा प्रयोग करीत असून त्यामुळे उत्पादनही वाढले आहे आणि उत्पादित मालाची मागणीही वाढली आह़े कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा हा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितल़े
रासायनिक शेतीने देश खिळखिळा करण्याचे विदेशी कंपन्यांचे षडयंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:50 PM