लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा, ता.शहादा येथील बसस्थानकाकडून केदारेश्वर मंदिराकडे जाणा:या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी आह़े मात्र तरीदेखील मोठय़ा संख्येने या मार्गावरून अवजड वाहने भरधाव वेगात ये-जा करीत असतात. त्याचप्रमाणे या परिसरात शाळा असल्याने विद्याथ्र्याची नियमीत वर्दळ असते. त्यामुळे अवजड वाहनांमुळे विद्याथ्र्याच्या जीवास धोका असून, अशा वाहनधारकांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.येथील बसस्थानक परिसरात मोठय़ा संख्येने वाहनांची वर्दळ असते. तसेच केदारेश्वर महादेव मंदिराकडे जाणा:या मार्गावर अवजड वाहनांस बंदी असल्याचा बोर्डदेखील लावण्यात आला आहे. मात्र याकडे संबंधित वाहनधारक दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने वाहने नेत असतात. या परिसरातील जिल्हा परिषद मराठी शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळेसह जिल्हा परिषद उर्दू शाळा, सवरेदय विद्या मंदिर, कै.एस.बी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय, खाजगी प्राथमिक शाळा, के.डी. गावीत इंग्लिश स्कूल आहे. यामुळे या मार्गावर विद्याथ्र्यानी नियमित गर्दी असते. तसेच हा मार्ग अरूंद असून, या मार्गावर समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. दरम्यान, शाळा सुटल्यावर या मार्गावर विद्याथ्र्याची वर्दळ असते. या वेळीच वाहन आल्यास विद्याथ्र्याना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे किरकोळ अपघातदेखील होत असल्याने या मार्गावरून जाणा:या अवजड वाहनांवर संबंधित विभागाच्या अधिका:यांनी दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या परिसरात गेल्या आठवडय़ात ट्रक उलटल्याची घटना घडली होती. या वेळी शाळा सुटली असती तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे नियम मोडीत काढणा:या अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच याठिकाणी कायम स्वरुपी वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमण्याची मागणीही करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.
बंदीच्या क्षेत्रातही अवजड वाहनांची वर्दळ : प्रकाशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:39 PM