लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील गावात महिलांसाठी 14 वा वित्त आयोग आणि पाच टक्के पेसाच्या निधीतून पाच न्हाणीघर आणि दोन शौचालय बांधण्यात येणार आहे. तशी योजना सुरू करण्यात आली आहे. ब:याच गावात महिलांना आंघोळ व शौचालयासाठी सुविधा नसल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागास या सुविधा निर्माण करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. न्हाणीघराच्या वरती दोन हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या ठेवण्यात येतील. एक पाण्याच्या टाकीला सोलर पॅनल बसविण्यात येईल. या टाकीतील पाण्याचा उपयोग आंघोळीसाठी व दुस:या टाकीतील पाण्याचा उपयोग शौचालयासाठी होईल. न्हाणीघराच्या निघणा:या पाण्यासाठी शोषखड्डा तयार करण्यात येणार आहे. अधिक लोकसंख्येच्या गावात युनिटच्या संख्येबाबत गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. या कामांचा समावेश ग्रामपंचायतीच्या ‘आमचा गाव आमचा विकास’ आरखडय़ात प्राधान्याने केला जाणार आहे. दरम्यान, अशा प्रकारचा उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यात तो पथदर्शी ठरणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या.
पेसा गावांमध्ये महिलांसाठी न्हानीघर बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:18 PM