लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील भाविकांना अस्तंबा यात्रेचे वेध लागले आहेत़ या यात्रोत्सवाची तयारी गावोगावी सुरू झाली असून सातपुडय़ात जागोजागी ढोल वादनाचे सराव आणि यात्रेच्या नियमांची पाळणी युवकांकडून सुरू झाली आह़े दुर्गम भागात यात्रेसाठी निघण्यापूर्वी युवक एकत्र येऊन सराव आणि स्वत: तयार केलेले अन्न घेत आहेत़दिवाळीपर्वात धनत्रयोदशीच्या मूहूर्तावर सातपुडय़ातील अस्तंबा येथे होणा:या अस्तंबा ऋषीची पारंपरिक यात्रा सुरू होत़े सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर असलेल्या अस्तंबा डोंगरावर समुद्र सपाटीपासून चार हजार फूट उंचावर असलेल्या या यात्रेत तिन्ही राज्यातील युवक, पुरूष सहभागी होतात़ सोमवारी दुपारनंतर भाविक अस्तंबा डोंगराकडे जाण्यास सुरूवात होणार असून मंगळवारी हा यात्रोत्सव सुरू होणार आह़े सातपुडय़ात होणारी अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी जाणा:या श्रद्धाळू युवा भाविकांकडून 15 दिवस ते सव्वा महीना अगोदर पासून नियमांची पाळणी करण्यास सुरूवात करण्यात आली होती़ गेल्या 12 दिवसांपासून दुर्गम भागातील अनेक गाव-पाडय़ांवरील युवक गावाच्या बाहेर शेतात झोपडी बनवून गटाने रहात आहेत़ खाटेवर न झोपणे, स्वत: तयार केलेले अन्न पदार्थ खाणे, स्वच्छता राखणे आदी नियम त्यांच्याकडून पाळले जात आहेत़ घरोघरी युवा भाविक शिधा गोळा करून त्याचा स्वयंपाक तयार करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आह़े
‘साहसी अस्तंबा’ यात्रेची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:29 PM
धनत्रयोदशीपासून यात्रोत्सव : युवा भाविकांकडून होत आहेत कठोर नियमांचे पालन
ठळक मुद्देढोलवरील विविध चालींचा सराव शेतात झोपडी तयार करून राहणा:या युवा भाविकांकडून विविध चालींवर ढोलचा सराव सुरू आह़े या सर्व चाली अस्तंबा यात्रेत वाजवल्या जाणा:या चाली आहेत़ ढोल ताश्यांच्या गजर करीत नाचतच द:याखो:यांमधून वाट काढणारे युवा भाविकांचा उत्साह शिगेला