ईश्वर पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सतत पायी फिरणे, योग्य आहार आणि निव्र्यसनीपणा यातून सुभान पावरा हे वयाची शंभरी पार करू शकले अशी माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली़ नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती असलेले सुभान पावरा यांचे शनिवारी निधन झाले होत़े शहादा तालुक्याच्या पूव्रेस 29 किलोमीटर अंतरावर असलेले लंगडी भवानी गाव सध्या 113 वर्ष जीवन व्यतीत करणा:या सुभान शिपला पावरा (गिरासे) यांच्या निधनानंतर प्रकाशझोतात आले आह़े 10 मुले-मुली आणि 29 नातवंडे असा 39 जणांच्या कुटूंबांचे प्रमुख असलेले सुभान पावरा परिसरात गिरासे या टोपणनावाने ओळखले जात होत़े मूळात शेतकरी असलेल्या सुभान पावरा यांचा जन्म 1905 साली भोंगरा ता़ शहादा येथे झाला़ वडील सिपान पावरा यांच्यासोबत शेती करणा:या सुभान यांना शहादा भागाच्या इंग्रज अधिका:याकडे शिपाई म्हणून नोकरी मिळाली होती़ याचदरम्यान वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा भुरीबाई यांच्यासोबत झाला़ शिपाई म्हणून काम करत असल्याने त्यांचा लंगडी ते बोराडी आणि शहादा ते लंगडी असा पायी प्रवास कायम व्हायचा़ इंग्रज अधिका:यांच्या बग्गीमागे पायी चालण्याच्या सवय कायम राहिल्याने ते आजारांपासून लांब होत़े साधारण 1920 नंतर त्यांना लंगडी शिवारात इंग्रजांनी जमिन लंगडी येथे त्यांनी घर बांधले त्यांचे घर हे त्या लंगडी गावातील पहिले घर असून गावच सुभान पावरा यांनी बसवल्याचा दावा त्यांच्या कुटूंबियांनी यावेळी केला़विवाहानंतर त्यांना दारासिंग पावरा, जामसिल पावरा, रेजल पावरा, सुकलाल पावरा, खोत्या पावरा, रबीबाई, सबीबाई, लिलाबाई आणि जबीबाई ही 10 अपत्ये झाली़ यात काही वर्षापूर्वी वृद्धापकाळाने दारासिंग पावरा यांचे निधन झाल़े आज लंगडी येथे त्यांची मुले, सुना, नातू आदी 21 जणांचा परिवार निवास करत आहेत़ उर्वरित मुलींच्या परिवारातून 18 जण शहादा तालुक्यात निवास करतात़ निरोगी आणि निव्र्यसनी असलेले सुभान पावरा हे शहादा आणि शिरपूर येथेही पायीच जात असल्याची माहिती देण्यात आली़ गावातील सर्वात वयोवृद्ध असल्याने सर्वच त्यांचा आदर करत होत़े शेवटच्या घटकेर्पयत ते शेतीत जात होत़े कुटूंबातील प्रत्येक सदस्याला 100 पूर्ण झाल्यानंतर ते ओळखत होत़े नव्वदी पार करूनही त्यांची चांगली असलेली स्मरणशक्ती ही सर्वासाठी आश्चर्याची बाब होती़ त्यांच्या पत्नी भुरीबाई यांचे 2013 मध्ये निधन झाले होत़े काठीशिवाय इतर कोणत्याही आधाराविना ते दर दिवशी सकाळी 1 किलो मीटरवरील शेतात फेरफटका मारून पुन्हा परत येत होत़े
सतत पायी फिरणे, योग्य आहार यातून पार केली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:31 PM