लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 30 : तळोदा तालुक्यातील रोझवा पाडळपूर, धनपूर, गाढवली, सिंगसपूर आदी लघुप्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणीगळती होत आह़े त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आह़े संबंधित लघुप्रकल्पांव्दारे बहुसंख्य गावांना पाण्याचा पुरवठा होत असतो़ परंतु बहुतेक लघुप्रकल्पांना लागलेल्या गळतीमुळे पाणी वाहून जात असल्याने लघुप्रकल्पांमधील पाणीपातळी खालावत आह़े धनपूर लघुप्रकल्पाला वगळता रोझवा, पाडळपूर, गाढवली, सिंगसपूर या लघुप्रकल्पांच्या दुरुस्तीविषयी गांभीर्याने घेणे महत्वाचे आह़े या चारही प्रकल्पांचे गेट तसेच पाटचारीची दुरुस्ती वेळोवेळी होत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत़ रोझवा लघुप्रकल्पाची समस्या तर अत्यंत वाईट असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े सांडव्याची दगडी भिंत दोन वर्षापासून खड्डेमय झाल्याने भिंतीला मोठमोठी छिद्रे आहेत़ त्या छिद्रांमधून दररोज शेकडो लीटर पाणी वाहून जात असत़े त्यामुळे पावसाळ्यात लघुप्रकल्प दुथळीभरुन वाहत असले तरी पाण्याच्या गळतीमुळे त्यातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे सांगण्यात येत आह़े परिसरातील शेतक:यांनी याबाबत वारंवार संबंधित विभागाच्या अधिका:यांकडे आपल्या व्यथा मांडल्या आहेत़ परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आला आह़े दरम्यान, हक्काचे पाणी दररोज विनाकारण वाहून जात असल्याने शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े शासनाकडून जलयुक्त शिवार तसेच पाणीदार गाव निर्माण करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात़ त्याच बरोबर पाण्याचे सिंचन व्हावे यासाठीही ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत असत़े परंतु अशा प्रकारे लघुप्रकल्पांमधून पाणी वाहून जात असल्याने प्रशासकीय कामकाजात विरोधाभास दिसून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े दरम्यान, रोझवा, पाडळपूर, लघुप्रकल्पांची गेट, पाटचारी दुरुस्ती झाल्यास सिंचनाखालील क्षेत्रामध्येही वाढ होणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़े पाणी गळतीमुळे आतार्पयत हजारो लीटर पाणी वाहून गेले आह़े त्यामुळे समाधानकारक पाऊस होऊनसुध्दा पावसाळ्यात पाण्याचे सिंचन होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आह़े पर्यायाने उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होत असत़े पाणी गळती थांबल्यास पाण्याचा साठा जास्त काळ शिल्लक राहण्यास मदत होणार आह़े गाळ वाहतुकीस परवानगी द्यायला हवीरोझवा, पाडळपूर, लघूप्रकल्पात सुपीक गाळ ब:यापैकी साचला असल्याने दरवर्षी शेतकरी स्वताच्या खर्चाने गाळ वाहून नेत असतात़ लघुप्रकल्पाच्या खोलीकरणालाही मदत होत असत़े त्यामुळे संबंधित विभागाने गाळ वाहतुकीला परवानगी देऊन प्रकल्पांचे खोलीकरणास सुरुवात करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े
तळोदा तालुक्यातील लघुप्रकल्पांमधील पाणीगळती सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:54 PM