लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रचंड पोलीस बंदोबस्तात झालेल्या पालिकेच्या सभेत पाच विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, मागील सभेचे इतिवृत्त, दुषीत पाणी पुरवठा, पाण्याअभावी जळालेली झाडे यासह इतर विषयांवर विरोधकांनी आक्षेप नोंदविले. गेल्या महिन्यातील सभेचा अनुभव पहाता या सभेत फारसा गोंधळ व आरोप-प्रत्यारोप न होता सभा झाल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला. नाटय़गृहाच्या आवारात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा र}ा रघुवंशी होत्या. प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, उपनगराध्यक्षा शोभा मोरे आदींसह सर्व विषय समिती सभापती व नगरसेवक उपस्थित होते. सभेच्या विषय पत्रिकेवर एकुण पाच विषय होते. सुरुवातीलाच मागील सभेचे इतिवृत्तातील नोंदीवरून विरोधी पक्षाचे प्रतोद चारुदत्त कळवणकर यांनी काही आक्षेप नोंदविले. त्या आक्षेपांवर नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी उत्तरे देवून विरोधकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.विषय पत्रिकेवरील कामनाथ नगर ते शांतीनगर पाण्याची टाकीकरीता ठगीदाईन विहिरीजवळील नवीन बुस्टरपंपासाठी विद्युत पंप बसविणे, चाचणी करणे तसेच इतर कामांसाठी संबधीत ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत टोकरतळे ते नंदुरबार्पयत 450 मि.मी.व्यासाच्या डीआय पाईपलाईन टाकणे कामासाठी संबधीत ठेकेदारासही मुदतवाढ देण्यात आली.पालिकेतर्फे राबविण्यात एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांचा लाभ देण्यासाठी मागविण्यात आलेल्या अर्जानुसार लाभाथ्र्याची यादी मंजुरीसाठी जिल्हा गृहनिर्माण समितीपुढे सादर करण्यास मान्यता देण्यात आली.शहरासाठी राबविण्यात येणा:या पाणी पुरवठा योजना, अशुद्ध पाणी जलशुद्धीकरण प्रकल्प, पथदिवे यांच्यासाठी लागणारी वीज आणि त्यातून येणारे वीज बील लक्षात घेता सौरउर्जा प्रकल्पाद्वारे वीजेची गरज पुर्ण करण्यासाठी वैशिष्टेपुर्ण योजनेअंतर्गत अथवा इतर शासकीय निधीअंतर्गत अनुदान मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्याचाही ठराव करण्यात आला. याशिवाय इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली.अशुद्ध पाणी पुरवठाचा आरोपसभेत विरोधी सदस्यांनी अशुद्ध पाणी पुरवठय़ाचा आरोप केला. त्यासाठी त्यांनी पाण्याचा नमुना असलेली बाटली देखील आणली होती. शहरवासीयांना जर जलशुद्धीकरणाअंतर्गत पाणी पुरवठा होत असल्याचा दावा होत असेल तर अशुद्ध पाणी कसे येते असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर नगराध्यक्षा आणि संबधित अभियंत्यांनी पाईपलाईनचे काम सुरू असल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. शिवाय टीसीएल पावडर खराब निघाल्याने देखील समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.शांतीनगरातील तब्बल 200 झाडांना पाणी न मिळाल्याने ती जळाल्याची बाब देखील विरोधकांनी निदर्शनास आणून दिली. तेथील कुपनलिकेची मोटर जळाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.विस्कळीत पाणीपुरवठागेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. त्यावर नगराध्यक्षांनी स्पष्टीकरण केले. बुस्टरपंपाचे सुरू असलेले काम, पाईपलाईनला फोडण्याचा झालेला प्रय} आणि इतर तांत्रिक कारणांमुळे ही समस्या उद्भवल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. इतर शहरांच्या तुलनेत नंदुरबारला एकदिवसाआड आणि तेही पुरेसे पाणी मिळत आहे. पालिका त्यासाठी प्रय}शील आहे. गेल्या 15 दिवसात नागरिकांना त्रास होऊनही त्यांनी सहकार्य केल्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. येत्या आठवडाभरात पाणीपुरवठाचे वेळापत्रक सुरळीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मागील सभेत झालेला राडा लक्षात घेता यावेळी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. पोलिसांनीही सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था लक्षात घेवून बैठकीच्या वेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्यासह एक निरिक्षक व दोन उपनिरिक्षक आणि 15 ते 20 पोलीस कर्मचा:यांचा बंदोबस्त होता. नगरसेवक, पालिका कर्मचारी आणि पत्रकार यांच्याव्यतिरिक्त नाटय़गृहाच्या परिसरात कुणालाही प्रवेश दिला जात नव्हता. नगरसेवकांना आयकार्ड दाखवूनच प्रवेश देण्यात आला.विरोधकांकडून आभारपालिकेची सभा लोकशाही पद्धतीने चालवून विरोधकांनाही त्यांचे म्हणने मांडण्याची, बोलण्याची संधी दिल्याने व ते ऐकुण घेतल्याने विरोधी पक्षाचे प्रतोद चारुदत्त कळवणकर यांनी सभागृहाचे आभार मानले.
दुषीत पाणीपुरवठय़ावरून नंदुरबार पालिका सभेत वादविवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:58 AM