लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर कपात करून सरकार सर्वसामान्यांसह गोरगरीब जनतेवर एकप्रकारे अन्याय करीत आहे. तर दुसरीकडे नवनवीन योजना राबवून भांडवलदारांना अधिकच प्रगत करत आहे, असा आरोप आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे राज्याचे अध्यक्ष सुनील धानवा यांनी येथील अधिवेशनात केला.प्रकाशा, ता.शहादा येथील सद्गुरू दगा महाराज धर्मशाळेत आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे दुसरे अधिवेशन येथे झाले. राज्याचे अध्यक्ष सुनील धानवा हे अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते. येथील बसस्थानकापासून सकाळी साडे अकरा वाजता मिरवणूक काढण्यात आली. यात विविध पदाधिका:यांसह मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रम स्थळी मिरवणूक पोहोचल्यानंतर ध्वजवंदन करण्यात आले. तद्नंतर अध्यक्षीय मंडळ स्थापन करण्यात आले. किसान मंचचे ज्येष्ठ नेते जयसिंग माळी, सरपंच भावडू ठाकरे, रूबाबसिंग ठाकरे, अंजू पाडवी, सुदाम ठाकरे, रवींद्र ठाकरे, मासूम मन्यार, इंदिरा चव्हाण, सुनील गायकवाड, तापीबाई माळीच, उत्तम पवार, खंडू सामुद्रे, मालती वळवी, हमीद शहा, जगन ठाकरे, सुभाष पाडवी, सुकलाल भिल आदी उपस्थित होते.याप्रसंगी विविध विषयांवर विचार विनिमय करण्यात आला. किसान सभेचे ज्येष्ठ नेते जयसिंग माळीच यांनी उद्घाटन पर भाषण केले. त्यांनी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत उपाय योजना सुचविल्या. धानवा म्हणाले की, धर्मातर करून आदिवासी समाजात येणा:यांची संख्या वाढली आहे. हे थांबले पाहिजे. देशाचा मुळ निवासी आदिवासी असून, न्याय हक्कासाठी संघटीतपणे लढा दिला जाईल. संघर्ष केल्याशिवाय हक्क मिळणार नाही तरी एक दिलाने प्रय} होणे गरजेचे आहे. शिक्षणाची कास धरा. शिक्षणानेच आपण प्रगल्भ होऊ. समाज एकवटला तर गुलाम करण्याची ताकद कुणाचीच नाही. सूत्रसंचालन अनिल ठाकरे तर आभार मालती वळवी यांनी मानले.मंचच्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष सुदाम ठाकरे, जिल्हा निमंत्रक दयानंद चव्हाण, सह निमंत्रक विक्रम वळवी, रवींद्र ठाकरे, अनिल ठाकरे, रामसिनग मोरे आदींचा समावेश असून, विस्तारीत कार्यकारणी लवकरच जाहीर करण्यात येईल
आदिवासी अधिकार मंचचे प्रकाशात अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:35 AM