नंदुरबार : अखिल भारतीय वारकरी मंडळाची नंदुरबार जिल्हा बैठक घेण्यात आली़ यावेळी 23 ते 30 डिसेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व वारकरी संमेलन आयोजनाचा ठराव पारित करण्यात आला़ नंदुरबार जिल्ह्यात अध्यात्म परंपरेला वृद्धींगत करणे आणि सांस्कृतिक मुल्यांची जपवणूक करण्याच्यादृष्टीने हे वारकरी संमेलन भरवले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आल़े वारकरी मंडळाच्या जिल्हाशाखेची बैठक शहरातील दंडपाणेश्वर उद्यानात आयोजित करण्यात आली होती़ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले होते. यावेळी खान्देश विभागीय अध्यक्ष भाऊराव महाराज पाटील, खान्देश विभागीय सचिव डॉ.अजय खैरनार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माळी, अनिल महाराज वाळके, प्रा.सी.एस.पाटील, प्रकाश महाराज जाधव, माळी समाजाध्यक्ष आनंद बाबुराव माळी, गोविंद पाटील (पाष्टेकर) उपस्थित होत़े यावेळी 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत माळीवाडा परिसरात होणा:या अखंड हरिनाम सप्ताह व वारकरी संमेलनाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली़ संमेलनात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या चार जिल्ह्यातून वारकरी बांधवांची उपस्थिती राहणार आह़े आठ दिवस हरि किर्तन उपक्रम होणार आह़े तसेच व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, पाणी अडवा-पाणी जिरवा, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्त्रीभृ्रण हत्या आदी सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत़ नंदुरबार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी प्रास्ताविक केल़े प्रसंगी पावबा महाराज आक्राळेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर पाटीलभाऊ महारु माळी यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बैठक यशस्वीतेसाठी नगरसेवक लक्ष्मण माळी, नगरसेवक निलेश माळी, भगवान माळी, नरेंद्र माळी, प्रेम पवार यांच्या माळीवाडय़ातील युवकांनी परिश्रम घेतले.
डिसेंबरमध्ये होणार वारकरी संप्रदायाचे महासंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:01 PM