शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कॉपीमुक्त परीक्षा अभियानास तिलांजली

By admin | Published: February 17, 2017 1:24 AM

दहावी-बारावी परीक्षा : शिक्षण विभागासह शाळाही यंदा उदासीन, आता बैठकांचे सत्र

नंदुरबार : येत्या 15 दिवसात बारावी व दहावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येते. परंतु यंदा या अभियानाबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये पाहिजे तशी जनजागृती होत नसल्याची स्थिती आहे. शिक्षण विभागाकडूनदेखील शिक्षक मेळावा, प्रशिक्षण किंवा सहविचार सभा झालेली नसल्याचे स्पष्ट आहे.दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालाच्या टक्केवारीबाबत जिल्ह्याची प्रगती नाशिक विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमीच राहते.  त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी त्याची झलक दहावी, बारावीच्या परीक्षांच्या निकालातून उमटून येत नाही. ही बाब लक्षात घेता शिक्षण विभागातर्फे दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच विविध उपक्रम राबवून विद्याथ्र्याना कॉपीमुक्त परीक्षेसाठी तयार केले जाते. यंदा मात्र असे उपक्रम अभावानेच दिसून आले.यंदा उदासीनतापुढील आठवडय़ापासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. दहावीच्या लेखी परीक्षांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरुवात होईल. सध्या विद्यार्थी अभ्यासात मगA     आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा संपल्या आहेत. विद्याथ्र्याना शाळांमध्ये     निरोपदेखील दिले गेले आहेत. असे असताना यंदा कॉपीमुक्त अभियानासाठी विद्याथ्र्यामध्ये    फारशी जनजागृती करण्यात आलेली नाही. दरवर्षी डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून शिक्षण विभाग किंवा त्या त्या शाळांमार्फत असे अभियान राबविण्यात येत होते. यंदा केवळ विद्याथ्र्याना शाळेमार्फत देण्यात येणा:या निरोप समारंभाच्या वेळीच काही मोजक्याच शाळांनी तसे आवाहन केले.दरवर्षी केसेस दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळी कॉपीच्या केसेस दरवर्षी होतात. त्यातून विद्याथ्र्यावर कारवाईदेखील होते. कॉपी करणा:या विद्याथ्र्यामुळे, त्याला कॉपी पुरविणा:या शिक्षक, पालकांमुळे इतर विद्याथ्र्याना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कॉपीला लगाम लागावा यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी बैठक पथक, भरारी पथक यांची नेमणूक केली जाते. परंतु कॉपी केसेस होतातच. काही ठिकाणी शिक्षक, शाळादेखील त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कॉपीमुक्त अभियानाचा प्रभाव अशावेळी पडत असतो.सामूहिक कॉपीचे प्रकारदोन वर्षापूर्वी नंदुरबार तालुक्यातील एका केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्याअंतर्गत झालेल्या कारवाईत चार जणांवर ठपका ठेवण्यात आला होता. ही बाब राज्यभर गाजली होती. परिणामी नंदुरबारची कॉपीसंदर्भात बदनामीदेखील राज्यभर झाली    होती. गेल्या वर्षीदेखील काही   केंद्रांवर थेट कारवाई करण्यात      आली होती. त्यादृष्टीने प्रतिबंधासाठी यंदाही नियोजन करणे आवश्यक  आहे.आता बैठकांचे सत्रबारावीच्या परीक्षा आठ दिवसांवर, तर दहावीच्या परीक्षा 20 दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर आता शिक्षण विभागातर्फे बैठकांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. 17, 21 व 23 फेब्रुवारी रोजी प्रत्येकी दोन तालुक्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. 17 रोजी नंदुरबार व नवापूर तालुक्याची सभा सकाळी 11 वाजता श्रॉफ विद्यालयात होणार आहे. 21 रोजी तळोदा व अक्कलकुवा तालुक्याची सभा अक्कलकुवा येथील जामिया शैक्षणिक संकुलात होईल,   तर 23 रोजी शहादा, धडगाव तालुक्याची शिक्षकांची सभा विकास विद्यालयात सकाळी 11 वाजता होणार आहे. या वेळी दहावी व बारावीच्या परीक्षा, कॉपीमुक्त अभियान, शाळा सिद्धी प्रकल्प या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचवेळी एकूण विद्यार्थी संख्या आणि त्या अनुषंगाने करण्यात येणारी तयारी यावरही चर्चा करून नियोजन होणार आहे.दहावीच्या सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. येत्या दोन दिवसात या परीक्षादेखील संपणार आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा यापूर्वीच संपल्या आहेत. सध्या अभ्यासासाठी विद्याथ्र्याना सुटय़ा आहेत. 4आपापल्या शाळेतील दहावी, बारावीचा निकाल जास्तीत जास्त लागावा यासाठी अनेक शाळा प्रय} करीत असतात, त्यातूनच गैरमार्गानादेखील चालना मिळते. ही बाब लक्षात घेता अशा शाळांनादेखील चाप लावणे आवश्यक आहे.4भरारी व बैठे पथकातील सदस्य आणि केंद्रप्रमुख यांची नेमणूक करतानादेखील काळजी घेणे आवश्यक असते.दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी पूर्ण करण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रय} असतील. त्यासाठी येत्या आठवडय़ात तालुकानिहाय शिक्षकांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यंदा जनजागृती कमी झाली असली तरी कॉपीमुक्त परीक्षेवर भर राहिलच.-जी.एन.पाटील,शिक्षणाधिकारी (माध्यमिक)