लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०० च्या पार गेली आहे़ बुधवारी एकाच दिवशी २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्या ३०४ झाली आहे़ दरम्यान बुधवारी पहाटे नंदुरबार शहरातील तुलसीविहारमधील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला़ यामुळे मयतांची संख्या १५ झाली आहे़तुलसीविहार येथील ७५ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाला सोमवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मंगळवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ प्रकृती खालावल्याने त्यास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते़ उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे वृद्धाचा मृत्यू झाला़ गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे़दरम्यान दुपारी १२ वाजेच्या अहवालात शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीतील २० वर्षीय युवक, म्हसावद रोडवरील २३ वर्षीय महिला, वृंदावन नगरातील २७ वर्षीय महिला तसेच पुसनद ता़ शहादा येथील आठ वर्षीय बालिकेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते़ सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ यात नंदुरबार शहरातील कोकणी हिल, रायसिंगपुरा, पाटीलवाडी, श्रॉफ हायस्कूल, मोठा माळीवाडा, सरस्वती नगर येथे प्रत्येकी १ तर पायल नगर व गिरीविहार सोसायटी येथे प्रत्येकी दोन, तळोदा शहरातील सुमन नगर व माळीवाडा येथे प्रत्येकी १, सोनवद ता़ शहादा, मंदाणा ता़ शहादा, गरीब नवाज कॉलनी आणि गांधीनगर शहादा येथे प्रत्येकी एक अशा १६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे़ नव्याने समोर आलेल्या २० रुग्णांमुळे रुग्ण संख्या ३०४ झाली असून बुधवारी ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ सध्या जिल्हा रुग्णालयात ९९ जण कोरोनावर उपचार घेत आहेत़
४कोविड कक्षात नंदुरबार शहर व तालुक्यात सर्वाधिक ६८, शहादा २५, तळोदा २, नवापूर १, अक्कलकुवा २ तर धडगाव तालुक्यातील एक असे ९९ रुग्ण उपचार घेत आहेत़ बुधवारी तोरखेडा येथील ५, जिजाऊ नगर २, जिल्हा रुग्णालय १ तर नवापूर येथील जनता पार्कमधील १ रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे़
सात जुलै रोजी जिल्ह्यात रुग्णसंख्या ही २०० च्या आत होती़ सात रोजी रात्री एकाच वेळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णसंख्या २१६ झाली होती़ दरम्यान यानंतर कोरोनाबाधित समोर येण्याचा वेग वाढता राहिला आहे़ यातून ८ ते १५ जुलै या आठ दिवसांच्या काळात १०० रुग्ण समोर येऊन यातील पाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ नंदुरबार शहरात चार तर विसरवाडी येथील एका महिलेचा समावेश आहे़ रुग्ण संख्या वाढत असल्याने दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात रुग्णसंख्येने ३०० चा टप्पा पूर्ण झाला आहे़