लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या १० महिन्यात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे.जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. राज्यात सर्वदूर कोरोना रुग्ण वाढत असताना नंदुरबारात मात्र रुग्णांची संख्या कमी होती; पण सध्या गेल्या तीन महिन्यापासून राज्यात रुग्ण कमी होत असताना जिल्ह्यात मात्र रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही इतर भागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यूंची संख्या दोनशे पार झाली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करून नियम तोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीही जबाबदारीचे भान ठेवून नियम पाळण्याची गरज आहे.
कोरोना मृत्यूंची संख्या २०० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:38 PM