तालुक्यातील बामखेडा येथे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे, याकरिता आरोग्य विभागाने व जिल्हा परिषद वडाळी व बामखेडा येथील शिक्षक बामखेडा येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाचे आयोजन केले. यावेळी बामखेडा प्राथमिक उपकेंद्राच्या आरोग्यसेविका जोशना पाटील, आशा वर्कर्स शोभा गवळे, रंजना गवळे, पी.एम.सी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. चौधरी तसेच शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लसीकरण यशस्वतीकरिता सहकार्य केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच मनोज चौधरी, ग्रामसेवक मनीष रामोळे, पोलीस पाटील डॉ. योगेश चौधरी, ग्रामपंचायत शिपाई सिद्धार्थ कापुरे, राजेंद्र गवळे, पिरा हिरा बिल, ऑपरेटर कैलास गवळे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व कोरोना नियंत्रणासाठी घाबरून न जाता सर्वांनी लसीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन आरोग्यसेविका जोशना पाटील यांनी केले.
बामखेडा येथे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:35 AM