शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

शहरातील कोरोनाबाधित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली असून गुरुवारी दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर एका ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली असून गुरुवारी दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ यामुळे जिल्ह्यातील मयतांची संख्याही १६ तर बाधितांची संख्या ३२२ झाली आहे़शहरातील मुजावर मोहल्ला भागातील ६५ वर्षीय व शहादा येथील कुंभारगल्लीतील ७५ वर्षीय पुरूष अशा दोघाचे अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आले होते़ दरम्यान सायंकाळी प्राप्त अहवालात शहादा शहरातील पतंजली नगरातील दोन, नंदुरबार शहरातील रायसिंगपुरा भागात ३, चौधरी गल्ली व देसाईपुरा प्रत्येकी तर गुरुनानक सोसायटी येथील एक अशा आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ यातील गुरूनानक सोसायटीतील ७२ वर्षीय बाधिताला कोविड कक्षात बुधवारी रात्री दाखल करण्यात आले होते़ त्याचा गुरुवारी सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे़ बुधवारी रात्री गवळीवाडा, वृंदावन कॉलनी आणि खंडेराव पार्क येथे प्रत्येकी एक असे तीन रुग्ण आढळून आले होते़सध्यस्थितीत कोविड कक्षात ११२ जण उपचार घेत आहेत़ जिल्ह्यातून आतापर्यंत १८४ रुग्ण बरे होवून घरी परत गेले आहेत़ जिल्ह्यात आजअखेरीस सर्वाधिक २१६ कोरोनाबाधित रुग्ण हे नंदुरबार तालुक्यात, शहादा ६५, तळोदा २०, नवापूर ५, अक्कलकुवा १५ तर धडगाव तालुक्यात १ रुग्ण आजअखेरीस आढळून आला आहे़गुरुवार सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाने २ हजार ६७० जणांचे स्वॅब तपासले आहेत़ अद्याप ७६ जणांचे रिपोर्ट प्रलंबित असून सर्वाधिक ५६ स्वॅब हे नंदुरबारातील आहेत़