शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

दुष्काळझळांचा असाही मारा लागवडीचा खर्च वाया गेला सारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:15 PM

गुलाबसिंग गिरासे।  लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : चार-सहा महिने राबून उभे केलेले पीक केवळ पाणी नसल्याने डोळ्यासमोर कोरडे होताना ...

गुलाबसिंग गिरासे। लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : चार-सहा महिने राबून उभे केलेले पीक केवळ पाणी नसल्याने डोळ्यासमोर कोरडे होताना बघत शेतकरी दिवस काढत असल्याचे वास्तव सध्या तळोदा तालुक्यात अनुभवण्यास येत आह़े एकनव्हे प्रत्येक गावात किमान चार ते पाच बागायतदार शेतकरी पिकांची दुर्दशा छातीवर दगड ठेवून बघत आहेत़ मोड ता़ तळोदा येथील शेतकरी संजय कडू शिंदे यांनी जुलै 2018 मध्ये चार एकर क्षेत्रात केळी लावली होती़ लागवडीनंतर  10 महिने पूर्ण झाल्यानंतर अचानक टय़ुबवेलचे पाणी बंद झाल़े कूपनलिका पूर्णपणे कोरडी झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे दिसून आल़े पाणी देण्याचे दुसरे साधन नसल्याने त्यांना केळीची दुर्दशा गेल्या महिनाभर डोळ्यांनी बघावी लागली़ महिन्याभरापूर्वी हिरवीगार असलेली केळीची बाग आता शुष्क झाली असून त्याचा म्हणूनही उपयोग शक्य नाही़ शिंदे यांनी एकरी 40 हजार रुपये लागवड खर्च केला होता़ त्यांच्यासोबतच अंबालाल छगन नवले यांचे पाच एकर, एकनाथ माधव चव्हाण यांचे 4 एकर आणि जगन्नाथ चौधरी यांच्या सात एकर क्षेत्रातील केळीला पाणी न मिळाल्याने उत्पादन खर्चही निघू   शकलेला नाही़ या शेतक:यांनी शेतात  नांगर फिरवत केळीची झाडे काढून  टाकली होती़ त्यांनी शेतातून काढून टाकलेली झाडे याच परिसरात पडून आहेत़ त्यांना जनावरेही खात नसल्याचे सांगण्यात आले आह़े शेतात ठिबक सिंचनासह महागडी खते, मजूरी आणि इतर खर्च मिळून किमान पाच लाखांर्पयत खर्च करुनही  अशी स्थिती आल्याने शेतकरी हताश झाले आहेत़ मोड, बोरद, खरवड, त:हावद, खेडले, तळवे या भागातील हिरवळ गेल्या महिनाभरात हरवली आह़े ऊस, केळी आणि पपईला पाणीच नसल्याने शेतक:यांना पिक सोडून देण्यावाचून पर्याय नसल्याचे चित्र आह़े शेतक:यांनी पिकांना पाणी देण्याचा अंदाज बांधूनही अचानक कूपनलिका बंद पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े तालुक्यातील या प्रकारामुळे शेतकरी गोंधळले असून पुढे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आह़े