ऑनलाईन लोकमतनंदुरबार : पावसाने यंदा यथातथाच हजेरी लावली असली, तरी जिल्ह्यात 102 टक्के पिक पेरण्या झाल्या आहेत़ यात यंदा गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक सव्वा लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली असून पाऊस अनियमित असला तरी जिल्ह्यात या पिकांची स्थिती चांगली आह़े यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने दोन लाख 68 हजार हेक्टरवर पिकांच्या पेरण्या होण्यांचे संकेत दिले होत़े यातुलनेत 89 टक्के पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता होती़ मात्र या सर्व शक्यतांवर शेतक:यांनी मात करत आजअखेरीस दोन लाख 74 हजार 190 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या केल्या आहेत़ यातही धान्य, कडधान्य आणि तेलबियांचे क्षेत्र एकीकडे आणि केवळ कापूस क्षेत्र एकीकडे असे चित्र आह़े जिल्ह्यात झालेल्या 102 टक्के क्षेत्रापैकी 45 टक्के क्षेत्रात कापूस लागवड झाली आह़े गेल्या दोन वर्षात कोरडय़ा दुष्काळाने हैराण शेतक:यांनी यंदा जून महिन्यात निर्धारित वेळेवर पाऊस पडल्यानंतर तात्काळ पेरण्या सुरू केल्या होत्या़ दोन वर्षात पिकांचे वेळोवेळी झालेले नुकसान व उत्पादनात सातत्याने येणारी घट यामुळे कडधान्य आणि धान्य पिकांऐवजी शेतक:यांनी नगदी कापसाला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले आह़े
जिल्ह्यातील 45 टक्के क्षेत्रावर कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:55 AM
102 टक्के पेरण्या : पिकांची स्थिती चांगली असल्याने समाधान
ठळक मुद्दे दोन वर्षाच्या तुलनेत या वर्षात वाढ जिल्ह्यात 2015 मध्ये एक लाख एक हजार 373 तर 2016 च्या खरीप हंगामात 85 हजार 463 हेक्टर कापूस लागवड करण्यात आली होती़ त्या तुलनेत यंदा 1 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्रात कापूस पेरा पूर्ण करण्यात आला आह़े चालू हंगामात नंदुर