शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

न्यायालयाच्या निकालाने बदलले शहाद्यातील राजकारणाचे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:07 PM

शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांना ‘स्टे’ मिळताच तालुक्यातील निवडणुकीचे वातावरण एकदम निवळल्याने गणेशोत्सवातील उत्साह देखील कमी झाला. धुमधडाक्यात सुरू झालेला गणेशोत्सव निवडणुकीच्या स्थगितीमुळे या निवडणुकीतील भावी उमेदवारांनी मदतीचा हात आखडता घेतल्याने उत्सवाची सांगता निरुत्साहात झाली.ऐन गणेशोत्सव काळात तालुक्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ...

शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांना ‘स्टे’ मिळताच तालुक्यातील निवडणुकीचे वातावरण एकदम निवळल्याने गणेशोत्सवातील उत्साह देखील कमी झाला. धुमधडाक्यात सुरू झालेला गणेशोत्सव निवडणुकीच्या स्थगितीमुळे या निवडणुकीतील भावी उमेदवारांनी मदतीचा हात आखडता घेतल्याने उत्सवाची सांगता निरुत्साहात झाली.ऐन गणेशोत्सव काळात तालुक्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्याने सारा तालुका निवडणूकमय झाला होता. विशेषत: पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमुळे तालुक्यात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. पं.स. आणि जि.प. निवडणुकीचे गट-गण रचना जाहीर झाल्यावर भावी उमेदवारांनी सोयीच्या गट-गणांची चाचपणी केली होती. त्यानंतर गट-गणांचे आरक्षण जाहीर झाल्यावर भावी उमेदवारांनी निवडणूक लढविणार असलेल्या गट-गणात लक्ष केंद्रीत करून संपर्क अभियानही सुरू केले होते. गणेशोत्सवात निवडणूक लागल्याने गणेश मंडळांच्या कार्यकत्र्याचा आनंद द्विगुणीत झाला. भावी उमेदवारांनी देखील गणेश मंडळाचे कार्यकर्ते निवडणुकीत ‘मदतद करतील या अपेक्षेने गणेश मंडळांना भरभरुन मदत केल्याने गणेशोत्सवाची सुरुवात मोठय़ा धुमधडाक्यात झाली. भावी उमेदवारांनी गट-गणातील मंडळांना भरभरून मदत केल्याने संपूर्ण गणेशोत्सव आनंदात पार पडेल, अशी गणेशभक्तांची अपेक्षा होती. मात्र गट-गणातील आरक्षण, रचना आदी मुद्यांवर राजकीय पक्षातील नेत्यांनीच आक्षेप अकोला व वाशीम जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपाठोपाठ धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदांनादेखील न्यायालयाने तीन महिन्यांची स्थगिती दिल्याने तालुक्यातील निवडणुकीची हवा ‘गुल’ झाली. निवडणुकीस स्थगिती मिळताच भावी उमेदवारांनी गट-गणातील संपर्कासही स्थगिती दिल्याने गणेशोत्सवाचा उत्साह अध्र्यावरच थांबला. भावी उमेदवारांनी मोठय़ा उत्साहात गणरायांची स्थापना केली. मात्र गणरायांना निरोप देण्याच्यावेळी हात आखडता घेतल्याने गणेश विसजर्नातला उत्साह मावळला.गण-गणाचे आरक्षण जाहीर झाल्याबरोबर राजकीय पक्षांच्या आखाडय़ातही सोयीचा गट-गण मिळविण्यासाठी भावी उमेदवारांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. शहादा तालुक्यात जि.प. गटाच्या एकूण 14 जागांपैकी केवळ चार जागा इतर मागासवर्गीय गटासाठी (ओबीसी) त्यातही दोन महिलांसाठी राखीव असल्याने ओबीसी पुरुषांसाठी असलेल्या फक्त दोन जागांसाठी भावी उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू झाली होती. पाडळदा बुद्रुक व म्हसावद या ओबीसी जागेसाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील तुल्यबळ उमेदवारांनी दावेदारी केली होती. निवडणुकीतील रणनीती ठरविण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकत्र्याचे मेळावे घेऊन निवडणुकीचे वातावरण तापले होते. निवडणुकीला ‘स्टे’ मिळाल्यामुळे हे वातावरणही निवळले आहे.